
Mumbai 20 Jan 2025: मुंबईतील बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. शाळकरी दोन चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला 5 पोलिसच जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती कोर्टाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे. त्यामुळे शिंदेच्या एन्काऊंटला पोलिसच जबाबदार असल्याचे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या कोर्टाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोर्टाच्या चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.बंदुकीवर अक्षय शिंदेंचे फिगरप्रिंट नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.
काय आहे कोर्टाच्या अहवालात
अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत.
घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार पोलिसांची भूमिका संशयास्पद
अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत,
अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही.
दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता.
पोलिसांच्या ताब्यात असताना तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली होती.
मुंब्रा बायपास जवळून जात असताना एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर अक्षयने ओढून घेतली होती.
त्याने मोरे यांच्यावर 3 गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दोन पोलिस अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केला.
यातील एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरीरावर लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.