Bajrang Sonwane : शब्द दिला अन् खराही केला! बजरंग सोनवणेंनी पवारांच्या पायावर विजय ठेवला

Sharad Pawar NCP : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आणि जिल्ह्यातील शरद पवारांची पहिली सभा 6 मे रोजी आष्टीत होती. परंतु, त्यांचा आवाज बसला आणि ताप चढल्याने त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले.
Bajrang Sonwane Meet Sharad Pawar
Bajrang Sonwane Meet Sharad PawarSarkarnama

Beed Lok Sabha 2024 Result News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा होती. मात्र, शरद पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचे दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले.

त्यावेळी भावनिक साद घालत सोनवणेंनी विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो, असा शब्द दिला होता. त्यानुसार विजयी झाल्यानंतर सोनवणेंनी आपला शब्द खरा केला आणि गुरुवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीतून बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, राज्यात व केंद्रात सत्ता आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव व मातब्बर नेत्या पंकजा मुंडे समोर उमेदवार. त्यावेळी शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने उमेदवारीची गदा बजरंग सोनवणेंच्या खांद्यावर दिली.

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आणि जिल्ह्यातील शरद पवारांची पहिली सभा 6 मे रोजी आष्टीत होती. परंतु, त्यांचा आवाज बसला आणि ताप चढल्याने त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यावेळी बजरंग सोनवणे यांनी ‘साहेब आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हाला लढू द्या, तुम्ही फक्त तब्येतीला जपा,’ अशी भावनिक साद घालत विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो’ असा विश्वास सोशल मीडीयावरुन पवारांना दिला होता.

अटीतटीच्या लढतीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आणि शरद पवारांना विजय पायावर आणून ठेवण्याचा शब्द खरा केला. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे साडेसहा हजार मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील काही भागांत दौरे करुन गुरुवारी मुंबई गाठली. पक्ष कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली व स्वत: दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली.

आपण दिलेला शब्द पाळता आल्याचा आपल्याला आनंद असल्याचे भेटीत सोनवणे म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक आघाडीचे प्रेदशाध्यक्ष महेबुब शेख उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Bajrang Sonwane Meet Sharad Pawar
Baramati & Ajit Pawar : बारामतीच्या पराभवानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; 'मीच जबाबदार...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com