Kalyan Dombivli News : काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणी संदर्भात संपर्क करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक खरोखरच चांगले आणि योग्य करायचे असेल तर ते राज यांच्या व्हिजननेच व्हावे. राज यांच्याशिवाय दुसरे कुणी ते बनवू शकत नाही. त्यामुळे त्यांचा विचार घ्यायला हरकत नाही, असे आमदार राजू पाटील म्हणाले.
ठाकुर्ली येथे मनसेचे नेते प्रदीप चौधरी यांच्या शाखेच्या उद्घाटनावेळी पाटील उपस्थित होते. यावेळी प्रकाश भोईर, मनोज घरत, संदीप म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणाच्या काही क्लिप आहेत. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्या संग्रहित करून ठेवल्या आहेत. अशी देखील माहिती मिळते की राज यांनी तो संग्रह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला पण होता.
माझी अशी मागणी आहे की बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर ते राज यांच्या व्हिजनने विचारांनी व्हायला पाहिजे. राज्यातील बाळासाहेबांच्या नावाचे पहिले स्मारक नाशिकमध्ये आहे. तेथे शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तेव्हा राज ठाकरे असे बोलले होते, की बाळासाहेबांचे स्मारक असे असले पाहिजे. त्यातून शस्त्र बाहेर आली पाहिजे. याच प्रकारे येथे वेगळे विचार घेऊन बाळासाहेबांची भाषण शैली कशी होती. या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहीजे.
गेले दोन अडीच वर्षे तुम्ही पहाल पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार पोलीस (Police) यंत्रणांचा आणि संस्थांचा गैरवापर करत आहे. गुंडशाही जांच्यावर केसेस आहेत त्यांना पक्षप्रवेश दिला जातो. अशा गोष्टी होत असताना कुणी पक्षावर टीका केली तर त्यांना मारहाण होते हे दुर्दैवी आहे. आजकाल सोशल मीडियावर एखाद दुसरा पक्षाचा कार्यकर्ता बोलत असेल तर त्याला मारहाण होते. आता पत्रकारांवर पण हीच वेळ आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पत्रकारांनी सुद्धा या गोष्टींचा निषेध केला पाहिजे. पक्ष कोणताही असो परंतु अशा गोष्टी खपवून घेतल्या नाही पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.