"सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल; थोरातांचा फडणवीसांना टोला

Balasaheb Thorat : सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही.
Balasaheb Thorat, Devendra Fadnavis
Balasaheb Thorat, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांबद्दल टि्वट करुन खळबळ उडवून देणारे भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. तर, फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या देखील फडणवीस यांची काल (बुधवारी) भेट घेतली.यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Balasaheb Thorat news update)

याबाबत काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी थोरात माध्यमांशी बोलत होते. थोरात म्हणाले, "सागर बंगला (Sagar Bungalow) कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असं म्हणत थोरातांनी फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

Balasaheb Thorat, Devendra Fadnavis
Delhi High Court : भाजपच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा होणार दाखल

"सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे," असे थोरात म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावरुन थोरातांनी चिमटा काढला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com