Sada Sarvankar News : 'ती' गोळी शिंदे गटातील आमदाराच्या बंदुकीतूनच सुटली..

Sada Sarvankar News : आमदार पिता, पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
Sada Sarvankar  News
Sada Sarvankar Newssarkarnama
Published on
Updated on

शिंदे गटाचे (Eknath Shinde)आमदार सदा सरवणकरांच्या (sada sarvankar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गणेश विजर्सन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan 2022) पार पडली. पण प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली होती.

Sada Sarvankar  News
Hasan Mushrif News : सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ ED च्या रडारवर कसे आले ? ; ही आहे भाजपची खेळी

प्रभादेवी परिसरातील राडा आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच गोळीबार प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर व त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना दादर यापूर्वी पोलिसांनी समन्स पाठवले होते. पोलिसांकडून आमदार पिता, पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवाल आला आहे. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळते असल्याचे दिसतेय.

सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून झाला असा आरोप झाला, मात्र हे आरोप सरवणकरांनी फेटाळले होते. आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच 'ती’गोळी सुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Sada Sarvankar  News
Hasan Mushrif ED Raid : ED कडून विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टारगेट केलं जातंय का ?

काय घडले होते

  • प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाने मंच उभारले होते. ठाकरे गटाच्या शेजारीच शिंदे गटाने आपला मंच उभारला होता. यावेळी या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले.

  • ज्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर समर्थक आपापसात भिडले.यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ केली,

  • या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते.

  • या प्रकरणी दादर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com