Teachers Constituency Election: शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार असला पाहिजे; मंत्री चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण

Maharashtra Politics : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची रणधुमाळी
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदार संघाची धुरा कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ते युतीचे उमेदवार म्हात्रे यांच्यासोबत ते मतदार संघ पिंजून काढत आहेत.

''शिक्षक संघटनांचे अनेक प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावत त्यांना न्याय दिला आहे. म्हात्रे यांना अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. शिक्षक मतदारसंघात शिक्षकच आमदार असला पाहिजे'', असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. त्यामुळे त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील निवडणुकीत भाजप्रणीत शिक्षक परिषदेत झालेली बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराने मारलेली मुसंडी, कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचा (NCP) पाठिंबा यामुळे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात शेकापचा विजय झाला होता. त्या पराभवातून भाजपाने (BJP) चांगलाच धडा घेतला आहे.

Ravindra Chavan
Narendra Modi News : मोदींच्या आगमनापूर्वीच बीकेसीमधली कमान कोसळली!

यंदा शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा हा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दर्शविला आहे. कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीते उमेदवार बाळाराम पाटील आणि युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट ही लढत होत आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते सलग दोन वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, 2017 च्या निवडणूकीत मोते यांना डावलत वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिक्षक परिषदेने घेतला होता.

त्यामुळे नाराज झालेल्या मोते यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिक्षक परिषदेला भोवली आणि कडू यांचा पराभव झाला. झालेली बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराने अनपेक्षितपणे मारलेली मुसंडी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हे सारेच मुद्दे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि त्यांचा विजय झाला होता. तर शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. या पराभवातून भाजपने आता धडा घेतला असल्याचे दिसते.

Ravindra Chavan
Jalna News : अधिकाऱ्यावर शाईफेक करणाऱ्या भाजप नगरसेवकाला एक वर्षाची कैद..

याबाबत बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले, ''हा मतदार संघ गेले अनेक वर्षे युतीचा म्हणून मानला जात होता. शिक्षक परिषदेचा उमेदवारास शिवसेना व भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत असे. अनेक वर्षाची ती प्रथा परंपराच होती. परंतू गेल्या निवडणूकीत काही घटना अशा घडल्या की उजव्या विचारांचे असलेले मोते सर, कडू आणि म्हात्रे हे एकमेकांविरोधात उभे राहीले.

मतांचे विभाजन झाल्याने पराभव पत्करावा लागला. परंतू आता तसे होणार नाही. सर्वांनी एकत्रित हे ठरविले आहे की शिक्षक परिषद, शिवसेना आणि भाजप या सगळ्या संघटनांचा मिळून एकच उमेदवार दिला पाहीजे. आणि त्यासाठी म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. म्हात्रे हे शिक्षक आहेत, आणि शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार असला पाहीजे'', असे मला वाटते असे ते म्हणाले.

''शिक्षकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांचा पाठिंबा, मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा, शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते यांचा पाठिंबा म्हात्रे यांना आहे. त्याचबरोबर उर्दु भाषिक शिक्षकांची एक वेगळी संघटना असून त्यांचाही पाठिंबा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय दिला जात आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने विविध शिक्षकांच्या संघटना या म्हात्रे यांना पाठिंबा देत आहेत''.

Ravindra Chavan
Kasba Assembly By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडणार का? बापटांचा झाला होता पराभव...

''कोकण विभागातील शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यांचा आमदार शिक्षकच असला पाहिजे. कारण आमदार जर शिक्षक नसेल तर काय परिणाम होतो हे सगळ्यांनी गेल्या निवडणुकी पासून अनुभवलं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रेजी स्वतः शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ते जाणून आहेत आणि आमदार पदावर नसताना देखील ते स्वतः शिक्षक वर्गासाठी काम करत आहेत.

त्यांची ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. शिवाय ज्ञानेश्वर हे युतीचे उमेदवार आहेत. युतीचं सरकार शिक्षक वर्गाच्या बाबतीत नेहमी जागरुक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला होता'', असं चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com