आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढे ढकलला; राऊतांसह १५ जण आजच अयोध्येला जाणार

Sanjay Raut| Aditya Thackeray| Ayodhya| आदित्य ठाकरेंसोबत अनेक शिवसेना नेते आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Adity Thackaraey ) यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आदित्य ठाकरे येत्या १० जूनला अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार होते. पण काही कारणास्तव त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरेंसोबत अनेक शिवसेना नेते आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. तेथे राम लल्लांचे दर्शन घेऊन शरयू नदीची आरती करणार आहेत. पण या दौऱ्यात कोणतेही शक्तीप्रदर्शन केले जाणार नाही फक्त प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी हा दौरा असेल, असे राऊत यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आम्ही राजनीतिक भावनेने नाही तर भक्तिभावाने, श्रद्धा भावाने जात आहोत. गेले दोन वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अयोध्येला जाता आले नाही. पण आता त्यासाठी हा अयोध्या दौरा करण्यात येणार आहे.

Sanjay Raut
राष्ट्रवादीच जोमात; आघाडी झाली तरच शिवसेना अन् काँग्रेस फायद्यात

या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही संध्याकाळी अयोद्धेला जात आहोत. मी, एकनाथ शिंगे, वरुण सरदेसाई असे आम्ही १५ जण अयोद्धेला जाणार आहोत. १५ जूनच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज अयोद्धेला जात आहोत. १५ तारखेला आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु किनारी आरती करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या काश्मीरी पंडितांच्या हत्यांवरुनही केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. "काश्मीर रक्तबंबाळ झाले आहे आणि भाजप सत्तेची आठ वर्षे कसली साजरी करत आहे? काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकारच्या कानात जात नाही का? काश्मिरमध्ये 1990 ला जेव्हा हत्याकांड झाले तेव्हा आणि आता देखील भाजप सत्तेत असताना काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे," असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली.

"काश्मीर पुन्हा एकदा जळत आहे, रक्तबंबाळ होत आहे, काश्मिरची स्थिती नियंत्रणाहून बाहेर गेली आहे आणि आमचे दिल्लीचे प्रमुख लोकं त्यांच्या राजकीय प्रमोशनमध्ये गुंतले आहे, कधी 'काश्मिर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करतात तर कधी 'पृथ्वीराज'चे प्रमोशन होत आहे. काश्मिरी पंडितांचे आक्रोश ऐकायला मात्र कोणीही तयार नाही," अशी खंत राऊतांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com