MLA Disqualification News : 'दहा ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय द्यावा लागणार'

Shivsena News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटालातील आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत.
Rahul Narevekar Notice to Shivsena MLA's
Rahul Narevekar Notice to Shivsena MLA's Sarkarnama

Prithviraj Chavan News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटालातील आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल लवकरच येण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घडामोडींवर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithvijar Chavan) यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत चव्हाण म्हणाले, ''माझी माहिती आहे व दिल्लीतही तशी कुणकुण आहे. 10 ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रकरणात निकाल द्यावा लागेल. शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

Rahul Narevekar Notice to Shivsena MLA's
Uddhav Thackeray News: आज माझ्याकडे पक्ष नाही, पण...; उद्धव ठाकरेंचं पोहरादेवी गडावरून भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांकडे प्रकरण सोपवले. त्याचा निकाल 11 मे रोजी दिला. त्यामुळे 10 ऑगस्टपर्यंत मी म्हणतो. त्याला तीन महिने होत आहेत. 90 दिवसांत निकाल दिला पाहिजे, असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात दिला होता, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांना काहीही करून पद हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांना अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवायचे नव्हते. त्यांना जयंत पाटील यांच्याकडे हे पद द्यायचे होते. मात्र, अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. भाजपामध्ये त्यांना मुख्यमंत्री करण्याबद्दल काय ठरले? त्याचे त्या पक्षात काय परिणाम होतील, संघ फक्त पाहात राहील का? शिंदे गटाचे काय होईल असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत काही तरी घडेल असे मला वाटते, असे चव्हाण म्हणाले.

Rahul Narevekar Notice to Shivsena MLA's
NCP MLA Saroj Ahire : काल सुप्रिया सुळे, आज भुजबळांनी केली विचारपूस

दरम्यान, यावेळी चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही भाष्य केले. चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार होती, हे स्पष्ट होते. पक्षामध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू होता. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अजित पवार पक्ष सोडून जात आहेत, असे त्यांना वाटत होते. मग खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी दिली तर काय होऊ शकते याची चाचपणी झाली. मात्र, अजित पवार सोडून जात नाहीत, असे पवारांना कळले, तेव्हा ते मागे आले, असे चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरु असताना अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठका सुरू होत्या. मध्यस्थी प्रफुल पटेल करीत होते, असा दावा चव्हाण यांनी केला. भाजपासोबत बोलणी सुरु असताना अजित पवार यांचे म्हणणे होते की, मला मुख्यमंत्री करा. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गटाचा त्याला विरोध होता. त्यांचा विरोध अजूनही आहे. असा दावा चव्हाण यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com