Bhagat Singh Koshyari ; कोश्यारींची उचलबांगडी की कानउघाडणी ; पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलवलं..

Bhagat Singh Koshyari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama

Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोश्यारी यांच्या विरोधात ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केला आहे. त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे.

खासदार उदयनराजे, शिवेंद्रराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र शब्दात कोश्यारींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोश्यारी यांची पाठराखण करीत त्यांनी असे विधान केले नसल्याचे म्हटलं आहे.

Bhagat Singh Koshyari
Hindu Mahasabha : हिंदू महासभा 'या' शहराचे नाव 'नथुराम गोडसे नगर' करणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान करुन महाराष्ट्रातील जनतेची भावना दुखावल्या आहेत, यांची दखल भाजपपक्ष श्रेष्ठींनी घेतली आहे. पश्रश्रेष्ठींनी त्यांना २४ व २५ तारखेला दिल्ली येथे बोलवले आहेत. कोश्यारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. पक्षश्रेष्ठीं कोश्यारींना पदावरुन हटविणार का कानउघडणी करणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

कोश्यारी काय म्हणाले होते..

औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ नुकताच झाला. यावेळी भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले झाले. मी आत्ताच्या काळात बोलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com