Bhagatsingh koshyari : राज्यपालांनी इच्छा व्यक्त केली : आता निर्णय पंतप्रधान मोदींच्या हाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कोश्‍यारी यांनी आपल्या भावना पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातल्या आहेत.
Bhagatsingh koshyari | PM Narendra Modi
Bhagatsingh koshyari | PM Narendra Modi

Bhatsingh Koshyari Ready To Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhatsingh Koshyari) यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कोश्‍यारी यांनी आपल्या भावना पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातल्या आहेत. राज्यपालांनी इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता पंतप्रधान काय निर्णय घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याला आधीच उशीर झाला आहे. त्यांनी आणखी उशीर न करता राजीनामा देऊन महाराष्ट्र सोडावा अशी मागणी आता विरोधकांकडून होऊ लागली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओढावून घेतली नाराजी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी काय चर्चेत होते. छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या बाबत त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांनी विरोधकांसह, राज्यभरातील शिवप्रेमींचाही रोष ओढावून घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यांच्याविरोधातील हे वातावरण काहीसे शांत झाले असतानाच आता त्यांनी स्वत:हून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Bhagatsingh koshyari | PM Narendra Modi
Congress News : पालघरमध्ये काँग्रेसला धक्का : बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

- महाविकास आघाडीसोबत मतभेद

यासोबतच महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यातील मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले होते. महाविकास आघाडी सरकार काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवरुनही अनेकदा दोघांमध्येही खटके उडाले होते. राज्यपालांनी आमदारांची यादी रखडवून ठेवत १२ आमदारांची नियुक्ती केली नव्हती. राज्यपालांची भूमिकेवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याती संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला.

- राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्ये

1.  ''गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही,''

2. `राजा-महाराजा चक्रवर्ती सब गुरू बिना कुछ भी नही. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा, मै शिवाजी और चंद्रगुप्त का छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है `. मै शिवाजी और चंद्रगुप्त को छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है, असेही कोश्यारी यांनी सांगितले.

3.  " वयाच्या १० व्या वर्षी सावित्रीबाईंचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की या वयात मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?

4.  'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है., असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com