Maharashtra Political Crisis: न्यायालयाच्या निकालावर मला काहीही बोलायचं नाही; निकालानंतर कोश्यारींनी दिली पहिली प्रतिक्रिया

Supreme Court Final Decision : "कुणी राजीनामा माझ्याकडे घेऊन आला तर मी त्याला राजीनामा नका देऊ? असं कसं सागंणार?"
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Final Decision on Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभाध्यक्षांना घ्यावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या बहुमत चाचणीसह इतर निर्णयावर जोरदार ताशेरे ओढले. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

Bhagat Singh Koshyari
Maharashtra Poltical Crisis: तेव्हा कुठे गेली होती तुमची नैतिकता?; न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

या पार्श्वभूमीवरच भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी म्हणाले, "जवळपास तीन महिने झाले आहेत. मी राजकीय प्रकरणापासून दूर आहे. जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं. त्यावर न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. मी ज्यावेळी पदावर होतो, त्यावेळी जे निर्णय घेतले ते योग्यच होते", असं ते म्हणाले.

Bhagat Singh Koshyari
Supreme Court : न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया , सत्याचा विजय झाला..; आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं..

"जर कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आलं तर मी त्यांना राजीनामा देऊ नका असं कसं म्हणाणार. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणं माझं काम नाही. काय चूक? काय बरोबर? हे ठरवणं विश्लेषकाचं काम आहे. हे माझं काम नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे", असं भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com