राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल

भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी राज ठाकरेंची सभा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
file photo
file photosarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : औरंगाबादमध्ये आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे आज कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे.

राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. पण ही सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम आहे. तर दुसरीकडे "राज ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल," असा विश्वास मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी व्यक्त केला आहे.

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी राज ठाकरेंची सभा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होत आहेत. राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दिली आहे.

file photo
शिवसेनेला थोपविण्यासाठी आप निवडणुकीच्या रिंगणात ; प्रीती शर्मा मेनन यांच्यावर जबाबदारी

पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या १६ अटींचे उल्लंघन राज ठाकरेंनी केलं तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेमुळे निर्माण झालेला हा वाद आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संदीप देशपांडे म्हणाले,"गुढीपाडव्याची सभा झाली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. मला असं वाटतं त्याचा पुढचा टप्पा हा संभाजीनगर (औरंगाबाद) आहे आणि या संभाजीनगरमधून एक ऐतिहासिक मॅसेज नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभर जाणार आहे,"

file photo
राज यांच्या सभेला गृहमंत्र्यांनी परवानगी का दिली ? इम्तियाज जलील यांनी सांगितलं कारण..

अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवला आहे तर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे अवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिका-यांचा ताफा मागवला आहे. सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com