Bhimashankar : 'भीमाशंकर महाराष्ट्रात नसून गुवाहाटीत..' मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, कोल्हे म्हणाले...

Amol Kolhe : शिवपुराणानुसार भीमा नदीच्या उगमापाशी देवस्थान...
Bhimashankar : Amol Kolhe : Hemant Biswa Sharma
Bhimashankar : Amol Kolhe : Hemant Biswa SharmaSarkarnama

Bhimashankar : आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वास शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. आसाम पर्यटन विभागाकडून अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातीलखेड तालुक्यातील भीमाशंकर प्रसिद्ध आहे. मात्र यावर आता आसामने दावा केल्यामुळे वाद घडण्याची शक्यता आहे.

हिंदी वर्तमानपत्रातून याबाबत आसामकडून जाहीरात करण्यात आलेली आहे. भीमाशंकर हे महाराष्ट्रात नसून ती आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आसामने हा दावा केल्यामुळे आता महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Bhimashankar : Amol Kolhe : Hemant Biswa Sharma
Supriya Sule News : सुसंस्कृत फडणवीसांना बिनबुडाचे आरोप करणे शोभत नाही..

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिला आहे. "भीमाशंकर हे मूळ हेमाडपंथी असलेले मंदिर आहे. हे गेली कित्येक शतकंहे बारा ज्यातिर्लिंगापैकी एक गणले जाते. आता ज्या शिवपुराणाचा आसामचे मुख्यमंत्री उल्लेख करतात, मात्र शिवलीला अमृतामध्येसु्द्धा याचा उल्लेख ,हे जे मंदिर आहे ते भीमा नदीच्या उगमापाशी आहे. ही भीमा नदी आसाममध्ये नाही, ती महाराष्ट्रात आहे," असे कोल्हे म्हणाले.

Bhimashankar : Amol Kolhe : Hemant Biswa Sharma
BJP MLA's Corruption News : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार : भाजप आमदार आणि त्यांच्या दोन मुलांना दोन वर्षांची शिक्षा

"खेड तालुक्यात असलेलं भीमाशंकराचं मंदिर हे वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या अशा भाविकांच्या श्रद्धा दुखावणाऱ्या दाव्याबाबत वेळीच हस्तक्षेप करावा," असे कोल्हे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com