BJP MLA's Corruption News : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार : भाजप आमदार आणि त्यांच्या दोन मुलांना दोन वर्षांची शिक्षा

त्यांनी नातेवाईकांची मर्जी राखत काँक्रीट रस्त्यासह काही कामे त्यांच्या मुलांनाही दिलेली आहेत.
 BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) हावेरीचे आमदार (MLA) नेहरू ओलेकर आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार (Corruption) आणि पक्षपात केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या अगोदर भारतीय जनता पक्षाचेच आणखी एक आमदार एम. पी. कुमारस्वामी यांना बनावट धनादेश प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. (Corruption in road works: BJP MLA and his two sons sentenced to two years)

सुमारे ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार नेहरू ओलेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी नातेवाईकांची मर्जी राखत काँक्रीट रस्त्यासह काही कामे त्यांच्या मुलांनाही दिलेली आहेत. बंगळूरच्या ९१ सीसीएच कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना आमदार नेहरू ओलेकर, त्यांची दोन मुले देवराज ओलेकर आणि मंजुनाथ ओलेकर यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा सुनावली आहे.

 BJP
Solapur BJP Leader : ‘श्रीकांत देशमुखांनी नांदायला नेले नाही तर आयुष्य संपवणार; मृत्यूला निंबाळकर, चंद्रकांतदादा जबाबदार’

न्यायालयाने आमदार ओलेकर आणि त्यांच्या मुलांना दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा दिल्याने लोकप्रतिनिधीं न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर होऊ शकतो.

 BJP
NCP MLA News : मतदारांची इच्छा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करू : राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे दुसरे एक आमदार एम. पी. कुमारस्वामी यांना बनावट धनादेश प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. ते मुद्देगीरीचे आमदार आहेत. आमदार कुमारस्वामी यांनी हुवाप्पा गौडा नावाच्या व्यक्तीकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले हेाते. हे पैसे परत करण्यासाठी आमदार कुमारस्वामी यांनी गौडा यांना दिलेले आठ धनादेश वठले नाहीत. यासंदर्भात हुवाप्पा गौडा यांनी आमदार कुमारस्वामी यांच्या विरोधात आठ खटले दाखल केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com