MNS : मनसेला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राज ठाकरेंना पत्र लिहित दिला तडकाफडकी राजीनामा

Raj Thackeray : मनसेच्या 'मसल मॅन'चा सर्व राजीनामा
Raj Thackeray News
Raj Thackeray News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Politics News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून मनसेच्या एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या आधीच मनसेच्या मोठ्या नेत्याने राजीनामा दिल्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 'मसल मॅन' अशी ओळख असलेल्या मनिष धुरी यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनिष धुरी हे मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासून कट्टर समर्थक आहेत.

Raj Thackeray News
Kasaba By-Election : भाजप उमेदवार अडचणीत;आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार?

मनिष धुरी यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच त्यांनी पक्षातील गटबाजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चाही सुरू आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याकडील असणाऱ्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray News
By Election : चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीत आतापर्यंत काय-काय घडलं? दोन गटात हाणामारी ते...

धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. असे असतानाच धुरी यांनी राजीनामा दिल्यामुळे याचा फटका मनसेला बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com