Government scheme : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 27 लाख नागरिकांना लाभ देणाऱ्या उपक्रमाची घोषणा

Shinde-Fadnavis government : प्रत्येक जिल्ह्यात शासकीय योजनांची जत्रा, राज्यातील 27 लाख लाभार्थ्यांना होणार थेट लाभ
Government scheme
Government schemeSarkarnama

Mumbai : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात येणार आहे. शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा उपक्रम 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा उपक्रम 15 जूनपर्यंत चालणार आहे.

या जत्रेच्या माध्यमातून जवळपास 27 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. 'जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची', असे हे अभियान असणार आहे.

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर जनकल्याण कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून कमीत कमी वेळेत विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Government scheme
Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

जनकल्याणाच्या अनेक योजनांची घोषणा करण्यात येतात. मात्र, नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, हे कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे, अशा अनेक प्रक्रियेला सामोरं जावं लागतं.

अनेकवेळा या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड येथे 'जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची' नावाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

Government scheme
Mahadev Jankar fight Baramati Loksabha : महादेव जानकर पुन्हा उतरणार बारामतीच्या मैदानात; भाजपच्या अडचणी वाढल्या

आता या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करणार आहेत.

या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल 2023 ते 15 मे, 2023 या कालावधीत करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com