Big Decision In NCP Meeting: राष्ट्रवादीची निवडणुकांची तयारी; 'या' बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Big Decision Regarding Lok Sabha - Vidhan Sabha Elections: राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने चर्चा झाली असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

देशात आणि राज्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा शरद पवार यांनी आढावा घेतला. यावेळी शरद पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

Sharad Pawar News
Ashok Chavan On Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाही...

"महाविकास आघाडी भक्कम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढू", अशा सूचनाही शरद पवारांनी यावेळी केल्या.

"कर्नाटकमध्ये सध्या जो ट्रेंड आहे. तोच ट्रेंड महाराष्ट्रात देखील आहे. भाजपची सत्ता येऊ नये, असा कौल मतदारांनी दिला आहे. त्यामुळे जनमत भाजप विरोधात असल्याचे दिसून येत आहे. असंच काहीसं चित्र महाराष्ट्रात आहे", असं पवारांनी बैठकीत सांगितलं.

दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर महत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांकावर आहे, त्या विभागाची जबाबदारी नेत्यांना दिली आहे.

यामध्ये कोकणची जबाबदारी सुनिल तटकरे, ठाणे- पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाड तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com