Resignation Of 9 Doctors: मोठी बातमी! डॉ. लहानेंसह जे.जेच्या ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे, केले 'हे' गंभीर आरोप

Dr. Tatyarao Lahane Resign : वरिष्ठ डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai News
Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईतील प्रसिध्द जे. जे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये केवळ शहरातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येत असतात. मात्र, आता याच रुग्णालयासंबंधी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जे. जे. रुग्णालयात विविध पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai News
Prakash Ambedkar News: "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. अधिष्ठातांवर आऱोप करणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. तात्याराव लहाने(Dr. Tatyarao Lahane) यांचं नाव आल्यानं या प्रकरणाची जोरदार चर्चा याबाबत जे. जे. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. हे पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रकाद्वारे डॉक्टरांनी राजीनामा देण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

लहानेंना 7 लाख रुपयांचा ठोठावला दंड...

तात्याराव लहाने हे सध्या सेवानिवृत्तीनंतरही काम करत आहे. मात्र, आता त्यांचेच वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून त्यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगत 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचं पत्रकात नमूद केलं आहे. यावर लहाने यांनी निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावल जात असून त्यांना भडकवण्यात जे. जेच्या अधिष्ठातांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Mumbai News
Bmc Election News: मुंबई महापालिकेची निवडणूक 'मविआ' एकत्र लढणार की स्वतंत्र?; महत्वाची माहिती आली समोर

जे.जे. रुग्णालया(J.J. Hospital) च्या ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचा देखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित ९ जणांनी राजीनामे(Resign) दिल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित डॉक्टरांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपली भूमिका मांडली आहे. मात्र, या राजीनाम्यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं आहे.दरम्यान, याविषयी जे.जे रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता, डॉक्टरांचे राजीनामे अजून आले नसल्याचं डॉ. सापळे म्हणाल्या. आणि या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com