MLA Raees Shaikh Resign : भिवंडीत मोठा राजकीय भूकंप! 'सपा'च्या रईस शेख यांचा आमदारकीचा राजीनामा; 'हे' आहे कारण

Political News : आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचं पाहायला मिळाले.
raees Shaikh
raees Shaikh Sarkarnama

Bhivandi News : सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेले आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राजकारण तापलेले असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आमदार पदाचा राजीनामा दिला. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून भिवंडी समाजवादी पक्षाचे (samajvadi party) आमदार रईस शेख (Raees Shaikh) यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचं पाहायला मिळाले.

raees Shaikh
Chandrakant Patil News : चंद्रकांतदादांनी भरसभेत शिरोळमधील माधवराव घाटगेंना दिली आमदारकीची ऑफर, पण...

रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आहे. ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित जमल्या होत्या. विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय शनिवारी दुपारनंतर बंद करण्यात आले होते. त्या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांसाठी केले होते विशेष कार्य

भिवंडी शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी रईस शेख यांनी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र आहेत. या महिलांनी कार्यालयाबाहेर एकत्रित होऊन मोठी घोषणाबाजी केली. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर, आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा दिला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीनाम्याचे कारण गुलदस्तातच

दरम्यान, रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, रईस शेख समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे.

R

raees Shaikh
आमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात 

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com