शरद पवारांना भेटण्यापूर्वीच ममता बॅनर्जींना मोठा झटका

ममता बॅनर्जी मुंबईत आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे
Mamata Banarjee - Sharad Pawar
Mamata Banarjee - Sharad Pawar

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांच्या मुंबई दौऱ्याचा आज (१ डिसेंबर) दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जीही आहेत. आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. मात्र बिगर काँग्रेस पक्षांना एकत्र करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर भाष्य केलं आहे. कॉंग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी शक्य नसल्याचे नवाब मलिकांनी म्हटले आहे. शरद पवारांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या गरजेवर वारंवार भर दिला आहे. परंतु काँग्रेसशिवाय अशी आघाडी शक्य नाही. आम्हाला वाटते की जर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हातमिळवणी करू शकतात, तर टीएमसीही काँग्रेसला सहकार्य करू शकते. जर काही मतभेद असतील तर ते सोडवले जाऊ शकतात,'' असा सल्ला मलिक यांनी दिला आहे.

Mamata Banarjee - Sharad Pawar
आदित्य ठाकरेंची नम्रता आणि ममता बॅनर्जींची विनम्रता!

दरम्यान, ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस (TMC) चा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ते देशभरातील राज्यांचे दौरे करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. आज ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या बॅनर्जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार होत्या, पण त आजारी असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना वडिलांच्या छायाचित्रांचे एक कॉफी टेबल बुकही भेट दिले. दिवसभरात बॅनर्जी यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनात्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com