BJP Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंना घेरलं!

Thane BJP VS Shivsena : ठाणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना दोघांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आपले टार्गेट फिक्स केले असून अब की बार 70 ची घोषणा त्यांनी दिली आहे.
 devendra fadnavis And eknath shinde
devendra fadnavis And eknath shindesarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र याचे चित्र स्पष्ट झाले नाही. वरिष्ठ कधी निर्णय घेणार याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच ठाणे महापालिका हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. येथे काय होणार याची देखील उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. मात्र, भाजपने पालिका निवडणुक लढण्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीरात ‘अब की बार 70 पार’ची घोषणा देत स्वबळाचा सूर अळवला.

इच्छुक उमेदवारांसाठी ठाणे भाजपने आयोजित केलेल्या या शिबिरात तब्बस 416 इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. या शिबीरात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मार्गदर्शन केले. यात उमेदवारांना संघटन, प्रचारतंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या माध्यमातून ठाणे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याची चर्चा असतानाच, कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा दिली. दरम्यान, एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचे आनंद आश्रमात बैठक होती. तेथे देखील कार्यकर्त्यांनी स्वबळाची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामाना आगामी ठणे महापालिका निवडणुकीत रंगण्याची शक्यता आहे.

 devendra fadnavis And eknath shinde
Santosh Khandekar : जालना महापालिका आयुक्तांना अटक; 10 लाखांची लाच घेताना ACB रंगेहाथ उचललं

आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जागावर कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवावा, अशी अपेक्षा शिबिरात कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वरिष्ठांचा निर्णय अंतिम

आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, संघटनात्मक आणि बूथ पातळीवर कसे काम करायचे याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी 70 पारचा नारा दिला मात्र असे असले तरी अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील जो निर्ण घेतील तो अंतिम असेल. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, ‘अब की बार 70 पार’ ची घोषणा देण्यात आल्या असल्या तरी या शिबीराचा आणि युतीच्या निर्णयाचा तसा काहीच संबंध नाही.

 devendra fadnavis And eknath shinde
Ravindra Dhangekar: धंगेकरांचं नेमकं काय गंडलंय? 'महायुती'नं राखलंय अंतर, मदतीला धावून आला 'मविआ'चा जुना मित्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com