BJP News: भाजपने राऊतांना भरला दम; आपले 'प्रताप' बंद करा, अन्यथा तुमची शुर्पणखा करु...

Maharashtra Politics: माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. जन्म गावाच्या मुद्द्यावरून राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक झाले आहेत.
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiSarkarnama

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Thackeray group)नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी औरंगजेबचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नुकतीच आगपाखड केली आहे.

मोदींची Narendra Modi औरंगजेबशी तुलना करताना ते म्हणाले की,नरेंद्र मोदींच्या गावात औरंगजेबचा जन्म झाला. काही महिन्यांपूर्वीही त्यांनी पीएम मोदींवर असाच हल्ला चढवून त्यांची तुलना औरंगजेबशी केली होती. या प्रकारानंतर रायगडमध्ये भाजप BJP कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारले, त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.

Sanjay Raut, Narendra Modi
Shiv Sena News: कल्याण सोडून जा, नाहीतर संपवून टाकेन; ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी

माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. जन्म गावाच्या मुद्द्यावरून राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक झाले आहेत. राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राऊतांनी हे 'प्रताप' बंद नाही केले तर त्यांची शुर्पणखा केली जाईल, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत

  • "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. म्हणूनच महाराष्ट्राला इतिहास आहे आणि औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला, इतिहास बघा...म्हणूनच (गुजरातची) माती औरंगजेबाची आहे आणि ही माती तिथेच आहे. दोन व्यापारी आहेत.

  • 'नरेंद्र मोदींच्या गावात औरंगजेबचा जन्म झाला, तुम्ही इतिहास बघा, अहमदाबादच्या पुढे दाहोद नावाचे गाव आहे जिथे औरंगजेबचा जन्म झाला. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, म्हणूनच तो आपल्याला औरंगजेबासारखी वागणूक देतो, पण या महाराष्ट्राच्या भूमीत आपण एका औरंगजेबाला गाडले आहे हे लक्षात ठेवा.

  • औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला तर मी काय चुकीचा बोललो, ज्या मातीत औरंगजेबचा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील. महाराष्ट्र तोडण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज

  • एवढ्या मिरच्या झोपायचं कारण काय, मोदींच्या बाजूला लावा औरंगजेबाचे फोटो, तुम्ही क्रूर, सूडबुद्धीने वागणारे त्याच वृत्तीचे लोक आहात. मी कोणाला औरंगजेब नाही म्हटलं ही एक विकृती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com