Amit Shah News : अमित शाह यांनी चंद्रकांतदादांचे कान टोचले ; 'त्या' विधानावर नाराजी, शेलारांना फोन..

Amit Shah Disappointed on Chandrakant Patil : चंद्रकांतदादांच्या अडचणी वाढणार
Amit Shaha News :
Amit Shaha News : Sarkarnama

Amit Shah Disappointed on Chandrakant Patil : भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी केलेल्या या विधानाची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचले आहे, अशा प्रकारची विधानं न करण्याचा आदेश त्यांना अमित शाह यांनी दिले आहे. यामुळे चंद्रकांतदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Amit Shaha News :
Karnataka Elections 2024 : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, दोन लाख मिळवा ; JDS नेत्याचे अजब विधान ; काय आहे प्रकरण ?

एका मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्यात शिवसेनेचं योगदान नाकारलं होतं. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं बाबरी आंदोलनात योगदान नाही. शिवसेनेचा नेता बाबरी पडताना तिथे नव्हता," असे विधान नुकतेच केले होते. त्यांनी बाबरी आंदोलनाचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच दिलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अमित शाह देखील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. (Political Breaking News)

Amit Shaha News :
karnataka elections : माजी मुख्यमंत्र्याचे सातव्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगणार की बंडखोरी करणार ? ; नड्डांच्या भेटीसाठी..

निवडणुकांच्या तोंडावर अशी विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शाह यांनी पाटलांना खडसावलं असल्याची समजते. वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, अशी ताकीद अमित शाह यांची भाजप नेत्यांना दिली आहे.

"बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. 'बाबरी'चा ढाचा पाडताना विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास यापूर्वीही अनेकदा केला गेला. राजकीय हेतूने वाद निर्माण करतात, असे पाटलांनी नमूद केलं आहे.

Amit Shaha News :
Karnataka Elections : भाजपकडून ५२ नव्या चेहऱ्यांना संधी ; नऊ डॉक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात..

अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी अमित शाह यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फोन केल्याचे समजते. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा काय रणनिती आखणार, चंद्रकांतदादांच्या अडचणी वाढणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Maharashtra News)

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com