Rajya Sabha : भाजपकडून गोयल, अनिल बोंडे, तर काँग्रेसकडून यूपीच्या प्रतापगडींना उमेदवारी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्येक एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
Rajya Sabha candidate
Rajya Sabha candidateSarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajya Sabha) भाजपकडून (BJP) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून यूपीचे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपकडून दोनच नावे जाहीर झाल्याने महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BJP announces Piyush Goyal, Anil Bonde and Congress announces Imran Pratapgadi)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने दोनच उमेदवार दिले आहेत. त्यात सध्याचे केंद्रीय मंत्री गोयल आणि अमरावतीचे माजी मंत्री आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बोंडे यांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्येक एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. शिवाय शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार जाहीर झाल्याने राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rajya Sabha candidate
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही सोलापूरची पाण्याची काय अवस्था? : अजितदादांचा शिंदे-मोहितेंना टोला

अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३१ मे आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे राऊत आणि पवार यांनी उमेदवार अर्ज भरले आहेत. काँग्रेसचे इमरान प्रतापगड हे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर उद्या सोमवारी (ता. ३० मे) अर्ज भरणार आहेत. भाजपचे उमेदवारही उद्याच अर्ज भरण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीची मुदत ३ जून असून गरज पडल्यास १० जून रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

Rajya Sabha candidate
पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेले इमरान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशमधील प्रतापगडचे आहेत. त्यांच्यावर भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांना केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेसाठी जाहीर झालेले पक्षनिहाय उमेदवार ः भाजप-पियूष गोयल, डॉ अनिल बोंडे. शिवसेना- संजय राऊत, संजय पवार. राष्ट्रवादी काँग्रेस- प्रफुल्ल पटेल. काँग्रेस-इम्रान प्रतापगडी.

Rajya Sabha candidate
चुकीची गोष्ट घडू नये; म्हणून मद्यप्राशन करून आलेल्या त्या कामगाराला मारले : राजेंद्र राऊत

अनिल बोंडे यांनी 1998 मध्ये शिवसेनामध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेतून 2004 मध्ये मधून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेने 2009 मध्ये तिकिट नाकारल्याने त्यांनी स्वतःचा जण संग्राम पक्ष स्थापन करून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 2014 मध्ये भाजप प्रवेश करून त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली व विजय मिळवला. तर 2019 मध्ये त्यांना शेवटचे चार महिने भाजपने कृषीमंत्री पद दिले व अमरावती जिल्हा पालकमंत्री बनविले होते. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी अनिल बोंडे यांचा मंत्री असतांना पराभव केला, त्यानंतर भाजपने त्यांना किसान मोर्चा प्रदेशध्यक्षपद दिले. त्यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चा सरचिटणीस पदही त्यांच्याकडे आहे. सध्या गुजरात व मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून ते काम पाहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com