Ashish Shelar Vs Shiv Sena Thackeray Party : मुख्‍यमंत्री पद अन् ठाकरेंचं 'तारे जमी पर'; आशिष शेलारांनी टायमिंग साधलं...

Ashish Shelar criticizes Shiv Sena Thackeray party : भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. शिवेसना उद्धव ठाकरे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाबाबत वल्गनाच राहिल्या, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
Ashish Shelar Vs Uddhav Thackeray
Ashish Shelar Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या..', अशा वल्‍गना करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 'तारे जमी पर आ गये', असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र!

तसंच ज्‍याचे आमदार जास्‍त त्‍यांना मुख्‍यमंत्री पद हा महायुतीचा फॉम्‍युला होता, हे सत्‍य ही आज उध्‍दव ठाकरे बोलून गेले, म्‍हणजे त्‍यावेळी ते मुख्‍यमंतत्री पद मागत होते ते कपोलकल्पित होते, असा टायमिंग भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी साधला.

महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यानंतर आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. "मुख्‍यमंत्री पदावर उध्‍दव ठाकरे यांनी आज जे विवेचन केले त्‍यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Uddhav Thackeray) 'तारे जमी पर आ गये', असे चित्र आहे. महाराष्‍ट्रात आमचाच चेहरा, मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा उध्‍दव ठाकरेच, अशा वल्‍गना शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्‍यात येत होत्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी दिल्ली जाऊन आले, तरी मागणी मान्‍य होत नाही. सिल्व्हर ओकला बैठका झाल्‍या, तरीही मागणी मान्‍य झाली नाही. त्‍यामुळे त्‍यांनी आज हे विधान केले. त्‍यांच्‍यातली धुसमूस बाहेर येत असून ही लाथाबुक्‍यांपर्यंत जाऊ नये", असा चिमटा देखील आमदार आशिष शेलार यांनी काढला.

Ashish Shelar Vs Uddhav Thackeray
Balasaheb Thorat : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, तर जमिनी जिरवण्यासाठी गुप्त बैठका; थोरातांनी फडणवीस आणि विखेंचं सर्वच काढलं

"कोरोना काळात ज्‍यांनी भ्रष्‍टाचार केले, पदविधरांचे भविष्‍य विस्‍कटले, त्‍यांच्‍या मुख्‍यमंत्री काळात माता भ‍गि‍नींवर अन्‍यायाचे पहाड कोसळावे, अशी परिस्‍थि‍ती निर्माण केली. रोजगार निर्मितीचे, आर्थि‍क गुंतवणुकीचे प्रस्‍ताव आले जे महाराष्‍ट्राच्‍या हिताचे होते, त्‍याला विरोध केला. संपादकांना अटक, बोलू द्यायचे नाही, लोकशाहीला धोक्यात आणले. ज्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रकल्‍प रोखले, महाराष्ट्राला बदनाम केले, त्‍या महाविकास आघाडीला, त्‍या महाराष्‍ट्रद्रोह्यांना तडीपार करणे, हद्दपार करणे, हाच आमचा कार्यक्रम आहे", असा इशारा भाजपचे (BJP) आशिष शेलार यांनी दिला.

Ashish Shelar Vs Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Vs Dhananjay Chandrachud : उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनाच सुनावले...

सरड्याने तक्रारीवर राऊतांवर गुन्हा...

संजय राजाराम राऊत हे, तर एवढे रंग बदलतात की, सरडाही आत्‍महत्‍या करेल आणि सरड्याच्‍या कुटुंबाने तक्रार केली, तर राऊत यांच्‍यावर गुन्‍हा दाखल होईल, असा टोलाही आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. कारण ते सीए, शेतकरी, एनआरसी सारखे कायदे आले की, सभागृहात बाजू घेतात. बाहेर येऊन विरोध करतात, ते 'मातोश्री'च्‍या बाजूने आहेत की, सिल्‍व्हर ओक हेही लोकांना कळत नाही. ते ज्‍या पध्‍दतीने रंग बदलत असतात त्‍यावरून सरडाही आत्‍महत्‍या करेल, असो टोला आशिष शेलार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com