Ashish Shelar & Milind Narwekar : 'बहुत याराना लगता है'! मिलिंद नार्वेकर अन् आशिष शेलारांची गळाभेट चर्चेत

Vidhan Parishad Election : क्रिकेट असो वा राजकीय मैदान या दोन्ही ठिकाणी शेलार आणि नार्वेकर यांच्यातील घट्ट मैत्री नेहमीच सर्वांच्या नजरेत भरते.
Ashish Shelar & Milind Narwekar
Ashish Shelar & Milind NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत भाजपला पाणी पाजले. यानंतर आता आमदारांतून विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी आपले निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवले आहे.

विधानभवनात अर्ज भरण्यासाठी आलेल्या नार्वेकरांची भाजपचे नेते आशिष शेलारांनी थेट गळाभेटच घेतली. यावेळी त्यांच्यात नेमका काय बोलणे झाले असेल, याची चर्चा विधानभवनात रंगली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मैत्रीला तोड नाही. क्रिकेट असो वा राजकीय मैदान या दोन्ही ठिकाणी शेलार आणि नार्वेकर यांच्यातील घट्ट मैत्री नेहमीच सर्वांच्या नजरेत भरते. ठाकरेंच्या राजकारणात पडद्याआड राहून सूत्र फिरवणारे नार्वेकर आता थेट राजकारणात उतरणार आहेत. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

नार्वेकरांनी विधानभवनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित मंगळवारी अर्ज भरला. त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठकारे यांच्यासमवेत विधानभवनातून बाहेर पडत होते. त्यावेळी आशिष शेलारांनी, 'नार्वेकर, नार्वेकर' अशी हाक मारली. शेलारांची हाक कानावर येताच नार्वेकरांनी ठाकरेंच्या गर्दीतून काही पावले मागे घेवून शेलारांची गळाभेट घेतली.

Ashish Shelar & Milind Narwekar
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या विरोधासाठीच 'येवलावाला' प्रयत्नशील, जरांगेंची भुजबळांवर टीका !

या भेटीत दोघांनी आतापर्यंत नेमके काय झालं? आणि आता यापुढे काय करायचं? याबाबत एकमेकांच्या कानात सांगितले का, याची चर्चाच दिवसभर विधानभवनात होती. विशेष म्हणजे विधानपरिषदेचा फैसला 12 जुलैनंतर होणार असला तरी आताच शेलारांनी नार्वेकरांच्या कानात काही गुपीत सांगितले असेल, याकडेच बोट दाखवले जात आहे. आता चर्चा काहीही होवोत, पण शेलार आणि नार्वेकर हे दिलदार मित्र असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashish Shelar & Milind Narwekar
BJP News : भाजपची मेहरनजर; केंद्रापासून ते विधानपरिषदेपर्यंत पुण्यातील नेत्यांची वर्णी का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com