'ब्राह्मण असल्यानेच भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही'

Devendra Fadanvis| महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा दिवसांत मोठी उलथापालथ झाली.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यानेच भाजपने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, राज्यात संपूर्ण बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सत्तेपासून दूर ठेवलं गेले, केवळ ते ब्राह्मण असल्यानेच भाजपने (BJP) त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही,असा आरोप ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा दिवसांत मोठी उलथापालथ झाली. या दहा दिवसात अनेक नाट्यमय घडामोडी राज्याने पाहिल्या. शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार फुटले. भाजपसोबत एकत्र येत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा आली आणि तिथेच ठिणगी पडली. जे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते, ते उपमुख्यमंत्री झाले आणि जे उपमुख्यमंत्री होणार होते, ते मुख्यमंत्री बनले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीच देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू झाली. यावर भाजप जाणून बुजून ब्राह्मण समाजाचं खाच्चिकरण करत असल्याची खंत ब्राह्मण महासंघाने व्यक्त केली आहे.

Devendra Fadanvis
आता गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येऊन मोदी-शहांना टक्कर द्यावी!

काय म्हटलं आहे ब्राह्मण महासंघाने ?

''पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून हटविण्यासाठी नितीन गडकरींच्या चारित्र्य हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेले तीन वर्षापासुन भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांचा घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचे षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. आत्ता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत पोहचविले, नंतर मा.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवल्यानंतर भाजपातील वरीष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपमध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललं निदर्शनास येत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com