Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचा एक निर्णय अन् दोन पक्षांचे अस्तित्व धोक्यात, राजकीय समीकरण बिघडले!

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे दोन पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. त्यामुळे एक पक्षप्रमुख थेट ठाणे दरबारी पोहोचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Eknath Shinde strategy before elections
Eknath Shinde strategy before electionsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बेरजेचे राजकारण सुरू केले होते. उल्हासनगरमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांनी इतर राजकीय पक्षांशी हातमिळवणी केली होती. मात्र, भाजपसोबत जाण्याचा एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्याने थेट दोन पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'टीम ओमी कालानी' आणि 'साई पक्षा'सोबत युतीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची भेट देखील घेतली होती. या दोन्ही पक्षासोबत शिंदेंची युती फिक्स झाली होती. मात्र, दिल्लीतून निरोप आल्यानंतर भाजपने माघार घेत शिंदेंसोबत युतीची बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे या दोनही पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले की, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार महायुती एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. भाजप आणि शिंदेंची युती होत असताना 'टीम ओमी कालानी' आणि 'साई पक्षा'पुढे थेट अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

भाजपचे राजेश वधारिया यांनी सांगितले की, वरिष्ठाच्या सूचनेप्रमाणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी यावर प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच जागावाटपासाठी निर्णायक बैठक पार पडणार आहे.

कालानी ठाणे दरबारी

महायुतीची घोषणा होताच ओमी कालानी यांनी तातडीने ठाण्यातील शिंदे दरबारात धाव घेतल्याची चर्चा आहे. भाजपसोबत युती करू नये, यासाठी त्यांनी गळ घातल्याचे समजते. याचे मुख्य कारण म्हणजे युती झाल्यास कालानी गटाला अनेक प्रभागांतून माघार घ्यावी लागू शकते. तसेच भाजप सोडून कालानींकडे गेलेल्या नेत्यांची आता दुहेरी कोंडी झाली आहे.

बंडखोरी अटळ

टीम ओमी कलानी यांना शिवसेना भाजप युतीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीमधून ज्यांना उमेदवारी नाकारली जाईल ते उमेदवार ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे किंवा प्रजा कृपा पार्टी यांसारख्या पक्षांकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी ही अटळ मानली जात आहे. शहरातील वर्चस्व टिकवण्याची 'आर-पार'ची लढाईसह काही राजकीय पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com