कुणाल राऊत यांना भाजपने दिला सल्ला... वडीलांप्रमाणे....

विक्रांत पाटील Vikrant Patil म्हणाले, ''यानिवडीतून काँग्रेसने Congress पुन्हा एकदा काँग्रेस हा घराणेशाही चालवणाराच पक्ष आहे, हे काँग्रेसने सुस्पष्ट केले आहे.
Kunal Raut, Vikrant Patil
Kunal Raut, Vikrant Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई ः ''युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सुपुत्राची निवड करून पुन्हा एकदा काँग्रेस हा घराणेशाही चालवणाराच पक्ष आहे, हे काँग्रेसने सुस्पष्ट केले आहे. नवनियुक्त युवक काँग्रेस अध्यक्ष यांना एक विनंती आहे, की ज्याप्रमाणे आपल्या वडिलांची सरकारी यंत्रणा स्वतःच्या व काँग्रेसच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने त्यांनी वापरली. आता स्वतः चा फायदा थोडासा बाजूला ठेऊन तिच सरकारी यंत्रणा किमान महाराष्ट्रातल्या युवांच दुःख नाहीस करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी वापरता येते का, हे पाहावे,'' असा सल्ला भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.

युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची निवड करण्यात आली आहे. यावरून भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लावून काँग्रेसची मतदार नोंदणी करण्याचे काम कुणाल राऊत यांनी केले होते. त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन भाजयुमोने केले होते.

Kunal Raut, Vikrant Patil
सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष

यावर विक्रांत पाटील म्हणाले, ''यानिवडीतून काँग्रेसने पुन्हा एकदा काँग्रेस हा घराणेशाही चालवणाराच पक्ष आहे, हे काँग्रेसने सुस्पष्ट केले आहे. नेत्याचाच मुलगा नेता होईल आणि मंत्र्याचाच मुलगा युवक अध्यक्ष होईल ही परंपरा काँग्रेसने पुन्हा एकदा जपली आहे. सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लाऊन काँग्रेसची मतदार नोंदणी करण्याचे काम कुणाल राऊत यांनी केले. याचे स्टिंग ऑपरेशन भाजप युवा मोर्चाने केले होते.''मात्र, दोषींवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

Kunal Raut, Vikrant Patil
नाना, तुम्ही पाटेकरच रहा, उगाच पटोले होऊ नका ; भातखळकरांचा टोला

सर्वसामान्य युवांना संधी देण्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी नुसत्या पोकळ गप्पा मारतात. मात्र, संधी देण्याची वेळ आली की नेत्यांच्याच मुलाला संधी देतात, यावरून काँग्रेसची घराणेशाहीची मानसिकता वारंवार स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच काँग्रेसचे आज अधःपतन होताना संपूर्ण देश बघत आहे.''

Kunal Raut, Vikrant Patil
राहूल गांधी पहिल्यांदाच येणार शिवाजी पार्कवर ?

श्री. पाटील म्हणाले, ''नवनियुक्त युवक काँग्रेस अध्यक्ष यांना एक विनंती आहे, की ज्याप्रमाणे आपल्या वडिलांची सरकारी यंत्रणा स्वतःच्या व काँग्रेसच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने त्यांनी वापरली. आता स्वतः चा फायदा थोडासा बाजूला ठेऊन, तिच सरकारी यंत्रणा किमान महाराष्ट्रातल्या युवांच दुःख नाहीस करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी वापरता येते का, हे पाहण्याचा प्रयत्न करावा,'' असा सल्ला त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com