भाजपाने नेमला मुख्यमंत्री कार्यालयात आपला खास माणूस !

सत्तापालट होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा सुरत, गुवाहाटी,गोवा आणि पुन्हा मुंबई या दौऱ्यात समन्वयाचे महत्वाचे काम कुलकर्णी यांच्याकडे होते.
Ashish Kulkarni
Ashish KulkarniSarkarnama

मुंबई : एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,(Balasaheb Thackeray) कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आशिष कुलकर्णी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करून आलेले कुलकर्णी हे प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष असून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) ) यांचे निकटवर्तीय आहेत. (Ashish Kulkarni BJP Man in Maharashtra Chief Minister Office)

Ashish Kulkarni
राष्ट्रवादीला धक्का देणारे अभिजित पाटलांच्या कारखाना, घर, ऑफिसवर इन्कम टॅक्सचे छापे

प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष असलेल्या कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपा असा राजकीय प्रवास झाला आहे. शिवसेनेत असताना कुलकर्णी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना मान्यता होती. पक्षाच्या थिंक टँकमध्ये त्यांचा अंतर्भाव होता.

Ashish Kulkarni
पायऱ्यांवरील आंदोलक आमदारांना मुख्यमंत्र्यांनी काय कानमंत्र दिला?

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात समन्वय राखला जावा यासाठी समन्वयक म्हणून कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस असा प्रवास करून ते भाजपात प्रदेश उपाध्यक्ष झाला आहेत. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नेमल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सत्तापालट होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा सुरत, गुवाहाटी,गोवा आणि पुन्हा मुंबई या दौऱ्यात समन्वयाचे महत्वाचे काम कुलकर्णी यांच्याकडे होते, असे सांगण्यात येत आहे. विधान परिषद व त्याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीतदेखील कुलकर्णी यांनी पडद्याआडून महत्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच त्यांच्याकडे समन्वयाचे काम सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.शिंदे गट आणि भाजपमधील आमदार तसेच मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचे काम कुलकर्णी यांच्याकडे असेल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com