मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर (Maharashtra Assembly) आंदोलन करताना काल सत्ताधारी गटाच्या व विरोधी पक्षाच्या (Opposition Group) आमदारांत चांगलाच राडा झाला होता. आज देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले. यावेळी तेथून जाणाऱ्या मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याच आंदोलक आमदारांना सुचना केल्या. (MLA shouts slogans on second day at assembly)
यावेळी आमदारांकडून `लवासाचे खोके बारामती ओके`, `जो हमसे टकराये गा मिठी मे मिल जाएगा` अशा घोषणा दिल्या जात होत्या. विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदारांच्या आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनाच्या पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढत असताना त्यांच्याच आंदोलन करणाऱ्या आमदारांना त्यांनी सूचनाही केल्या आणि सल्लाही दिला.
मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना `शांततेत करा; वाद घालू नका. आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सल्ला दिला`
सत्ताधारी गटाटे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन झाले. त्यात सत्ताधारी आमदार आज चांगलेच त्वेषात होते. त्यांच्याकडून `खड्ड्यांचे खोके; मातोश्री ओके`, `सचिन वाझेचे खोके; मातोश्री ओके`, `लवासाचे खोके; बारामती ओके`, `महापालिकेचे खोके; मातोश्री ओके`, `जय श्रीराम, जय जय श्रीराम`, `जो हिंदू हित की बात करेंगा वही देश पर राज करेंगा` या घोषणा दिल्या जात होत्या.
बच्चू कडूही आंदोलनात सहभागी झाले. यावेळी भरत गोगावले म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगितले आहे, रडायचं नाही, लढायचं, काल देखील हेच सांगितले होते, आजही सांगतो, आम्ही शांत बसणार नाही.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.