I.N.D.I.A. Mumbai Meeting : 'इंडिया'ला जास्त मते असूनही भाजप सत्तेवर; अशोक चव्हाणांनी सांगितलं कारण

Ashok Chavan On BJP : महाराष्ट्रातून सर्वधर्म समभावाचा संदेश देशाला देणार
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुंबईतील बैठकीत 'इंडिया'त दोन पक्षांची भर पडून हा आकडा २८ झाला आहे. शिवरायांच्या जन्मभूमी असलेला महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकला नाही. यामुळे या बैठकीला जास्त महत्व आहे. 'इंडिया'त सहभागी झालेल्या सर्व पक्षांना २०१९ मध्ये 'एनडीए'पेक्षा जास्त मते मिळाली होती. मात्र हे पक्ष विखुरलेले असल्याने भाजप सत्तेवर आली. आता हे पक्ष एकत्र लढणार असून देशात सत्ता परिवर्तन होणार, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. (Latest Political News)

पाटणा, बेंगळुरूनंतर (I.N.D.I.A) 'इंडिया'ची गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी सहभागी पक्षांचे प्रमुख दाखल झाले आहेत. या बैठकीचे यजमान पद असलेले राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चव्हणांनी भारतात २०२४ मध्ये सत्तांतर होणार असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले आणि खासदार संजय राऊतांनी आपले म्हणणे मांडले.

Ashok Chavan
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मोदींना आव्हान देत शरद पवारांचा अजितदादांना इशारा

"इंडिया आघाडीतील आता २८ पक्ष सहभागी झाले आहेत. यात ११ मुख्यमंत्री आहेत. यात भाजपचा तोडफोडी केलेल्या राज्यांचा समावेश नाही. २०१९ मध्ये या सर्व पक्षांना मिळून २३ कोटी ४० लाख मते मिळाली होती. तर भाजपच्या नेतृत्वातील 'एनडीए'ला २२ कोटी ९० लाख मते मिळाली होती. मात्र 'इंडिया'तील ते पक्ष देशभर विखुरलेले होते. त्यामुळे भाजपची सत्ता आली आणि पुन्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले. आता हे सर्व पक्ष एकत्र आल्याने ही मते मिळून सत्तांतर होण्यास मदत होणार आहे", असा दावा अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan
Satara BJP News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विश्वासू समर्थकावर भाजपकडून मोठी जबाबदारी

"रक्षाबंधननिमित्त भारताचे रक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी. बैठकीला सर्व पक्ष येणार आहे. इंडियात आता दोन पक्षांची वाढ झाली आहे. यापूर्वी दोन बैठका झाल्या. ही तिसरी बैठक होणार आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची, संत-महत्म्यांची, शाहू-फुले-आंबेडकारांची भूमी आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीपढे झुकल नाही. या भूमितून सर्व धर्म समभावाचा संदेश देशभर न्यायचा आहे. राज्याराज्यात तोडफोड करणाऱ्या सरकारला खेचण्याची वेळ आलेली आहे", असा इशाराही चव्हाणांनी यावेळी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com