चित्रा वाघ भडकल्या : महिला आयोगावर शूर्पणखा नको

चाकणकर आणि वाघ या एकेकाळच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र चित्रा वाघांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर या दोघींमध्येही अंतर वाढत गेले.
Chitra wagh- Rupalichakankar
Chitra wagh- Rupalichakankar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. मात्र बुधवारी (१३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Womens Commission) निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे.

मात्र, या नियुक्तीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कडाडून टिका केली आहे. यात त्यांनी रुपाली चाकणकरांचा थेट शूर्पणखा असा उल्लेख केला आहे. ट्विट करत त्यांनी रुपाली चाकणकरांच्या नियुक्तीवर टिकास्त्र डागलं आहे. ''महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.'' असं चित्रा वाघांनी म्हटलंं आहे.

Chitra wagh- Rupalichakankar
हसन मुश्रिफांच्या प्रकरणात सोमय्या केंद्रीय ग्रामविकास सचिवांकडे तक्रार करणार

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. चाकणकर आणि वाघ या एकेकाळच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेल्या. त्यापूर्वी त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा होत्या. तर रुपाली चाकणकर या पुणे शहरातील पक्षाच्या महिला अध्यक्षा होत्या. राष्ट्रवादीमध्ये असताना दोघींमध्ये त्यावेळी चांगलेच ट्यूनिंग होते.

मात्र चित्रा वाघांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर या दोघींमध्येही अंतर वाढत गेले. दोघींमध्येही राजकीय संघर्ष सुरु झाला आणि तो प्रचंड टोकाला गेला. मात्र चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे महिला संघटन मजबूत करण्यासाठीही रुपाली चाकणकरांनी मेहनत घेतली आहे. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात विविध आंदोलने करताना दिसतात. महामंडळाच्या नियुक्तीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समान वाटप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com