राजकीय धेंडं असतात तिथं असं होतं! दोन तरूणींच्या तक्रारीनंतर चित्रा वाघ संतापल्या

मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीकडून वाघ यांचीच तक्रार करण्यात आली आहे.
BJP Leader Chitra Wagh Latest Marathi News
BJP Leader Chitra Wagh Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणातील तक्रारदार तरुणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले अशी तक्रार या तरुणीने दिली आहे. त्यावर वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Mehabub Shaikh Rape Case Latest News)

चित्रा वाघ यांनी याबाबतचे ट्विटरवरून एका व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा करत आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटलं आहे. 'NCP च्या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा, असं आमच्याकडे सांगत आलेल्या पिडीतेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केलीये हे आताचं माध्यमातून कळलयं. ज्या केसेस मध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे,' असं वाघ यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

BJP Leader Chitra Wagh Latest Marathi News
राज्यसभा निवडणुकीतील 'त्या' तीन मतांमुळे शिवसेना रूसली; काँग्रेसला बसणार दणका?

'याआधाही एक महिन्यापूर्वी शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचीक यानेही पुडीतेवर दबाव टाकला आणि तिला चित्रा वाघ यांनीच हे करायला सांगितलं, असा बोलण्यास सांगितलं. नाहीतर तुला त्रास देऊ, असं म्हटलं होतं. ते आपण बघितलं की कशी तु मुलगी पुढे आली, असं वाघ यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

'मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे की, राजकारण आणि समाजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नाहीत. आम्ही त्या मुलीला मदतच केली आहे. यासंदर्भात जिथे ज्या यंत्रणा आम्हाला बोलवतील त्यांना आम्ही सहकार्य करू. पण म्हणून आम्ही काम करणं थांबवणार नाही. ज्या ज्या ठिकाणी अशी पॉलिटिकल धंडे येतात, तिथे अडचणी येतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे,' असं वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

मेहबूब शेख यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील बायजीपुरा भागात राहणाऱ्या २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या पिडीतेच्या तक्रारीवरुन डिसेंबर २०२० मध्ये औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तरुणीने आता घुमजाव करत आपल्याला असे काही करायचे नव्हते मात्र दोन तरुण, वाघ आणि धस यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले असा गौप्यस्फोट केला आहे. संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीमध्ये, मला असे काही करायचे नव्हते. मात्र विशाल खिल्लारी आणि नदीमुद्दीन शेख यांनी हे प्रकरण घडवून आणले, असे म्हटले आहे. पुढे चित्रा वाघ आणि सुरेश धस आपल्याला मुंबईत भेटले आणि त्यांनी तुला हे करावे लागले अन्यथा तु संकटात येशील, असे म्हणतं मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी दबाव वाढवला, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com