Chitra Wagh Vs Sushma Andhare: सुषमा अंधारे सटर-फटर नेत्या; चित्रा वाघांचा हल्लाबोल

Bhiwandi Lok Sabha 2024: राज ठाकरे यांचे कर्तुत्व मोठे आहे आणि त्यांच्यावर बोलणारे सटरफटर यांना फारसे महत्त्व देऊ नये, यांचे योगदान काय आहे, हे आपण पाहिलं पाहिजे, अशा शब्दात अंधारेंवर त्यांनी टीका केली.
Sushma Andhare, Chitra Wagh
Sushma Andhare, Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये सध्या जोरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आगपाखड केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे.

भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या प्रचारासाठी काल (मंगळवारी) सायंकाळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भिवंडीत तब्बल चार चौक सभांना हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

Sushma Andhare, Chitra Wagh
Danve Vs Kale: जालन्यात हवा काळेंची, पण बाजी दाजींची ?

सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर चित्रा वाघ यांना विचारले असता, राज ठाकरे यांचे कर्तुत्व मोठे आहे आणि त्यांच्यावर बोलणारे सटरफटर यांना फारसे महत्त्व देऊ नये, यांचे योगदान काय आहे, हे आपण पाहिलं पाहिजे, अशा शब्दात अंधारेंवर त्यांनी टीका केली. जे व्हिडिओ दाखवले ते व्हिडिओ सत्य आहेत, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. तर ठाकरे गटाच्या नेत्यांना किती गांभीर्याने घायचे हे ठरवलं पाहिजे, अशी टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांना फार पोषक वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आज मी घेतलेल्या चार चौक सभांमध्ये कार्यकर्त्यांना उत्साह दिसला. तेथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या सभांना गर्दी करीत आहेत.

मोदी यांच्या विकासाच्या सर्व योजना भिवंडी लोकसभा क्षेत्रात प्रभावीपणे राबविल्या गेल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सध्या भिवंडीच्या चौक सभांचे आयोजन केले जात आहे. या चौकसभांच्या माध्यमातून कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वातावरण ढवळून काढलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com