फडणवीसांनीच सांगितलं, ज्यांच्याविरोधात प्रचार केला...आता त्यांचाच प्रचार करणार!

2012 व 2017 सालामध्ये फडणवीस यांनी एका नेत्याविरोधात प्रचार केला होता.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून आमदारांच्या फोडाफोडीलाही वेग आला आहे. भाजपला (BJP) चोवीस तासात दोन मोठे धक्के बसले होते. कॅबिनेट मंत्र्याने (Cabinet Minister) बुधवारी रात्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका आमदारानेही पक्षाला रामराम ठोकला आहे. तर शुक्रवारी एका अपक्ष आमदाराने भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांचे पक्षात स्वागत करताना जोरदार फटकेबाजी केली. रोहन खंवटे हे 2012 आणि 2017 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपसह इतर पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारली होती. या दोन्ही निवडणुकांसाठी फडणवीस गोव्यात प्रचाराला गेले होते. त्यांनी पर्वरी मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.

Devendra Fadnavis
विरोधकांना धक्का; फडणवीसांनी आणखी एक आमदार फोडला

या निवडणुकांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, पर्वरी मतदारसंघाशी माझा संबंध जुना आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळी गोव्याच्या निवडणुकीत आलो त्यावेळी तिथे राहायला होतो. याच मतदारसंघात काम करत होतो. 2007, 2012 व 2017 या सगळ्या निवडणुकीत या मतदारसंघात काम केले. पण रोहनजी, 2012, 2017 मध्ये तुमच्या विरोधात मतं मागितली, आता या निवडणुकीत तुमच्यासाठी मतं मागण्याची संधी मला मिळाली आहे. रोहन यांच्यासारखा तरूण तडफदार नेता भाजपमध्ये दाखल झाला आहे.

गोवा आणि भारतातील सगळीकडची स्थिती सारखी आहे. इतर पक्षांमध्ये नेतेच दिसत नाही. केवळ भाजपमध्येच नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात चोवीस तास भारताचाच विचार आहे. तर गोव्यातही प्रमोद सावंत यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे रोहन यांच्यासारखे समाजात काम करणाऱ्या लोकांना असं स्पष्ट दिसत आहे, की देश पुढे न्यायचा असेल तर केवळ भाजप हाच पर्याय आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
काँग्रेसनं केलं चकित; माजी मुख्यमंत्र्यांसह आठ उमेदवारांची यादी जाहीर करत टाकला डाव

रोहन यांनी त्यांच्या स्वार्थासाठी प्रवेश केला नाही तर पुढील 20 वर्ष जनतेचे राजकारण करायचे असेल तर तो पक्ष भाजप आहे. मला विश्वास आहे की, वेगवेगळे पक्ष गोव्यात येत आहे. गोव्यात प्रयोगाची भूमी तयार केली आहे. पण गोवेकर हुशार आहेत. त्यांना हे समजते की, कोण आपल्यासोबत राहणार आणि कोण उडून जाणार हे कळते. दिल्लीचे, कोलकाताचे पक्ष येतात आणि राजकारण करतात. निवडणूकीत हरल्यानंतर परत जातात. परत तोंड दाखवत नाही. निवडणुका आल्या की परत येतात. त्यामुळे निवडणुकीसाठी येणाऱ्या पक्षांकडे कोणताही कार्यक्रम नाही, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

काँग्रेस पार्टटाईम पक्ष

काँग्रेस हा देशात नामशेष होत चालला आहे. काँग्रेस हा आता पार्टटाईम पक्ष झाला आहे. जुन्या पुण्याईवर चालविला जाणारा हा पक्ष आहे. पण आता तीही पुण्याई राहिली नाही. जुने नेतेही पक्षात राहिले नाहीत. त्यांचे नेतेच पार्टटाईम राजकारण करत आहेत, अशी खिल्ली फडणवीस यांनी उडवली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला. आप हा पक्ष केवळ ट्रेलर आहे, पिक्चर कुठेच नाही, असं म्हणत फडणवीसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com