धनगरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, ही काही घराण्यांची इच्छा! पडळकर आक्रमक

पडळकर सोमवारी आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Gopichand Padalkar criticizes Maharashtra Government
Gopichand Padalkar criticizes Maharashtra GovernmentSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सोमवारी आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. धनगर समाजाच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू न केल्यास गाठ माझ्याशी आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच प्रस्थापितांकडून माझ्या समाजाचा वापर फक्त सतरंज्या उचलण्यासाठी केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

पडळकर यांनी सोमवारी सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचा संदर्भ देत पडळकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही, तोपर्यंत त्यांना ताकद देण्याची क्षमता फडणवीस सरकारने दिलेल्या जे आदिवासांना तेच धनगर समाजाला या धोरणांतर्गत बावीस कल्याणकारी योजनेमध्ये होती. (Gopichand Padalkar criticizes Maharashtra Government)

Gopichand Padalkar criticizes Maharashtra Government
खळबळजनक : पुण्यातील मटका किंगची डोक्यात गोळी झाडून हत्या

या योजनांसाठी तत्कालीन सरकारने एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेत पुन्हा महाराष्ट्रातील तीन कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलं आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. मुघल, इंग्रज हरएक गनिमींना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज आहे. पण माझ्या समाजाचा वापर फक्त आणि फक्त प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे, असा निशाणा पडळकरांनी साधला.

लॉकडाऊन (Lockdown), अतिवृष्टी, गावागावातील हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो. त्यांना मला सांगायचे आहे की, धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा लक्षात ठेवू तुमची गाठ महाराष्ट्रातील तीन कोटी बांधव आणि गोपीचंद पडळकरबरोबर आहे, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com