खळबळजनक : पुण्यातील मटका किंगची डोक्यात गोळी झाडून हत्या

शिरवळ येथील एका इमारतीच्या टेरेसवर महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
Crime
CrimeSarkarnama
Published on
Updated on

शिरवळ : पुण्यातील मटका व्यावसायिकाची शिरवळ येथील एका इमारतीच्या टेरेसवर डोक्यात गोळी झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. हा खून कुणी केला, यामागचे कारण काय, याबाबत पोलिसांकडून (Police) तपास सुरू करण्यात आला आहे.

पुण्यातील (Pune) बिबवेवाडी येथे राहणारा संजय सुभाष पाटोळे (वय ३६) (Sanjay Patole Murder) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमळा भागात लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर पोटोळेचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. एक महिला इमारतीच्या टेरेसवर गेल्यानंतर तिला मृतदेह दिसला. त्यानंतर तिच्या पतीने याची माहिती शिरवळ पोलिसांना दिली. (Crime News)

Crime
सरपंचासोबत उपसरपंचाचं ग्रामपंचायतीतच जमलं अन् वर्षभरात बँड..बाजा..बारात!

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार ही व्यक्ती संजय पाटोळे असल्याचे स्पष्ट झाले. पाटोळे हा पुण्यातील मटका व्यावसायिक आहे. पाटोळे हा शिरवळमध्ये कशासाठी आला, कोणाकडे आला होता याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

लेक पॅलेस इमारतीतील रहिवाशांचीही चौकशी केली जात आहे. या इमारतीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे अनेक जण आहेत. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिक्षक अजुयकुमार बन्सल यांच्यासह पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अनिल बारेला, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com