राज्यावर कोरोनाचे सावट पण सोमय्यांना सतावतेय वेगळीच भीती

राज्यात कडक निर्बंध लागू केले जाण्याचा विचार सरकार करत आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रावर कोरोनाचे (Corona) संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून (State Government) कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला जाणार नसला तरी वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी हे निर्बंध लावले जाणार आहेत. पण त्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वेगळाच तर्क लावत भीती व्यक्त केली आहे.

सोमय्या यांनी यांनी याबाबतच व्हिडीओ शेअर केला असून त्यात सरकारवर टीका केली आहे. सोमय्या यांनी म्हटले आहे की, ठाकरे-पवार सरकार कोरोनाचे भय फैलावलत आहे. मुंबई गेल्या चार दिवसांत म्हणजे एक ते चार जानेवारी दरम्यान 33 हजार 352 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 29 हजार 276 रुग्णांना कुठलीही लक्षणे नाहीत. केवळ 2 हजार 300 रुग्णांना रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर चार दिवसांत 2702 रुग्णांना घरी सोडलं.

Kirit Somaiya
ते मोदींशेजारी बसणार होते पण रस्त्यात असतानाच रिपोर्ट आला अन्...

आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉनच्या रुग्णांना केवळ तीन ते चार दिवस रुग्णालयात रहावं लागतं. त्यामुळे ठाकरे-पवार सरकारने कोरोना काळात कमाईसाठी भीती निर्माण करू नये. कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कमाईसाठी हे सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 ते 75 टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता आहे. खाजगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाऊ शकतात. राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे सुत्रांनी सांगितले.

Kirit Somaiya
ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका नाहीतर...! WHO चा गंभीर इशारा

राज्यातील 80 हून अधिक आमदार कोरोनाबाधित

मंत्री, आमदार सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राजकीय व्यक्तींच्या सभा, रॅली, लग्नसोहळे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी २० आमदार, १० मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता ही संख्या वाढत आहे. आता ७० हून अधिक आमदार, १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली आहे. बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोरोनाबाधित झाले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर अनेक आमदारांना कोरोना झाल्याचे समोर आले. वर्षा गायकवाड यांच्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एकसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला. युवासेना नेते वरुण सरदेसाई हेही कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोरोना बाधित आढळून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com