Nitesh Rane On Thackeray: "राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा 'औरंग्या' कोण होता?"; नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane and Uddhav Thackeray: नितेश राणेंनी ठाकरेंना थेट उदाहरण देत सुनावले आहे.
Nitesh Rane and 
Uddhav Thackeray
Nitesh Rane and Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News: राज्यातील अनेक शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या स्टेटसवरून तणाव निर्माण झाला होता. यावरूनच ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचा खरपूस समाचार घेत जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता भाजप नेते नितेश राणेंनी ठाकरेंवर पलटवार करत "राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा 'औरंग्या' कोण होता?, असा सवाल करत निशाणा साधला आहे.

"मी असताना अशी दंगल झाली का?, आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का? फडणवीससाहेब औरंगजेब तुमच्या पक्षात दडला आहे", अशी तोफ ठाकरेंनी डागली होती. यावरून आता नितेश राणेंनी ठाकरेंना थेट उदाहरण देत सुनावले आहे.

Nitesh Rane and 
Uddhav Thackeray
Delhi Service Bill Breaking News : केजरीवालांना आणखी एक धक्का; लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही 'दिल्ली सेवा विधेयक' मंजूर

"मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता? राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता? बाळासाहेबांच्या बाकी वशंजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता? आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशा कपटी वृत्तीचा खरा औरंग्या कोण?", असा शब्दात नितेश राणेंनी ठाकरेंना ट्विटद्वारे सुनावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत असून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याने आता ठाकरे गटाकडून राणेंना काय प्रतिउत्तर देण्यात येते, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com