'एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका'

महाविकास आघाडीतील सत्ताधारी बसलेत घरात, दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी मात्र आर्थिक संकटात! आहेत
'एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका'

मुंबई : शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) पाप डोक्यावर असताना राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) आता आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप डोक्यावर घेऊ नये, अशी कळकळीची विनंती भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील सत्ताधारी बसलेत घरात, दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी मात्र आर्थिक संकटात! आहेत, अशी टिकाही त्यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला होता. राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बस डेपोत परिवहन महामंडळाच्या बस चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका'
भंगारवाला ते आक्रमक मंत्री; असा आहे नवाब मलिकांचा प्रवास

मात्र या घटनेवरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहे. कोरोना काळात आघाडीवर काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले गेले नाही. त्यामुळे या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1999 नंतर राज्यात सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच्या काळात राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे. 1999 नंतर आलेल्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग झाले.सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळापासून शेतकऱ्यांचे जीवनमान खालावले. परिणामी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचे प्रमाण वाढले.

एकीकडे नेत्यांच्या संपत्तीत वाढ झाली तर दूसरीकडे सामान्य नागरिकांचे खिसे मात्र रिकामे झाले. नागरिकांच्या समस्या नजरेत येऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांनी विषारी जातीय प्रचार सुरु केला. जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल दिली. आताही एसटी कर्मचाऱ्यांबाबत महाविकास आघाडी सरकार हेच धोरण वापरत असल्याचा आरोपही लाड यांनी केला.

सरकारच्या नियोजनशून्येमुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले. कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले. वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे खासगी उद्योगसमूहांना फायदा झाला. पण जर हीच कल्पकता एसटीच्या बाबतीत दाखवली असती तर एसटी तोट्यात गेली नसती. एकीकडे खासगी ओला-उबेर सारख्या खासगी वाहतूक सेवा फोफावल्या असताना सरकारने एसटीकडे मात्र दुर्लक्ष केले. एसटी देखील चांगला नफा मिळवू शकते. मात्र सरकारलाच एसटी चालविण्याची इच्छाशक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ ओढावली असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

राज्यातील अतिदुर्गम भागात, दूर डोंगरदऱ्यांमध्ये एसटी सेवा कार्यरत आहे. अशा स्थितीत निदान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना वेतनासाठी अनुदान द्यावे आणि भविष्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आवाहनही लाड यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com