सत्तेसाठी पटोले तलवार म्यान करतात ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

आम्ही भूमिका घेण्यापेक्षा कॉग्रेसने भूमिका घेतली पाहिजे, कारण कॉग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे,'' असे मत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी व्यक्त केले.
Praveen Darekar, Nana Patole
Praveen Darekar, Nana Patolesarkarnama

मुंबई : ''महाविकास आघाडी सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिवेशनात एसटी कर्मचारी व अन्य अनेक विषय असल्यामुळे सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिवाळी अधिवेशनात आम्ही भूमिका घेण्यापेक्षा कॉग्रेसने भूमिका घेतली पाहिजे, कारण कॉग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे,'' असे मत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते. दरेकरांनी यावेळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका घेतली पाहिजे. पण सत्तेसाठी ते तलवार मान्य करतील. तसं झाल्यास विदर्भावर अन्याय केल्यासारखे होईल. नाना पटोले हे सत्तेसाठी भूमिका घेतात आणि सत्ता टिकवण्यासाठी ते एकमतावर येतात,''

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी एका कार्यक्रमात भाजप-शिवसेना यांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर म्हणाले, ''गोखलेंची ती भूमिका आहे. शिवसेना-भाजप एकत्र येईल की नाही, मला माहित नाही, कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे,''

''शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं,'' असे गोखले काल म्हणाले. ''मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ''कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही, ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे ? माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,'' असेही गोखले म्हणाले.

काही राजकीय पक्षाचे घटक नैराश्यातून बंदचा निर्णय घेतात हे दुर्दैव!

नाशिक : ''राज्य सरकार चांगलं काम करत असतांना काही जण या निमित्ताने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही राजकीय पक्षाचे घटक सार्वजनिक शांततेला धक्का बसण्यासाठी नैराश्यातून बंद निर्णय घेत आहेत. हा प्रकार दुर्दैवी आहे,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले. ते माध्यमांशी बोलत होते. पवार हे सध्या नाशिक दैाऱ्यावर आहेत. शरद पवार (sharad pawar) म्हणाले, ''त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडलं (tripura maharashtra violence) म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com