Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपने कुठे दरवाजे उघडे ठेवलेत? मुनगंटीवारांचा पलटवार

Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: भाजप आणि मनसेत वादाची ठिणगी?
Sudhir Mungantiwar On Raj Thackeray
Sudhir Mungantiwar On Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: टोलनाका तोडफोडीच्या प्रकरणानंतर मनसे आणि भाजपमध्ये चांगलीच जंपुली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अमित ठाकरे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर राज यांनी भाजप-मनसेच्या युतीसंदर्भातही आज स्पष्टीकरण देत भाजपला चार हात लांबच ठेवणार, असल्याचे थेट संकेतच दिले. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही पलटवार करत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपने कुठे दरवाजे उघडे ठेवलेत, अशी खोचक टिप्पणी केली.

राज ठाकरे बुधवारी पुणे दौऱ्यावर असताना मनसे भाजपशी युती करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यावर राज यांनी म्हटले,"मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी कोणालाही भेटलं की युती होत नसते. प्रसारमाध्यमांकडून याची चर्चा केली जात असली तरी या सगळ्याचा आम्हा नेत्यांशी काहीही संबंध नसतो", असे राज यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar On Raj Thackeray
Raj Thackeray On BJP : राज ठाकरे भाजपला चार हात लांबच ठेवणार? युतीवरून फटकारले

राज यांच्या या भूमिकेबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला लगावत आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. "राज ठाकरे हे भाजपसोबत येणार नसतील तर ठीक आहे, आम्हीही त्यांच्यासाठी कुठे दरवाजे उघडे ठेवलेत? ते आमच्यासोबत येणार नाही, याचा आनंद असून त्यांनी आयुष्यभर आमच्यासोबत येऊ नये, अशी सदिच्छाही आहे", अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली.

Sudhir Mungantiwar On Raj Thackeray
Raj Thackeray On NCP: मोदींनी 70 हजार कोटींचा आरोप केलेल्या राष्ट्रवादीशीच भाजपची युती; राज ठाकरेंनी वर्मावर ठेवलं बोट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जवळीक वाढविलेल्या भाजपने आता शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) जवळ केल्यामुळे भाजप आणि मनसेत मतभेद वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने युतीत घेतल्यामुळे राज ठाकरे सध्या तरी भाजपपासून लांबच राहणार असल्याचे संकेत खुद्द राज यांनी दिले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com