Mohit Kamboj On Ajit Pawar : आधी डिवचलं मग सावरलं; अजितदादांना मोहित कंबोज यांनी काय म्हटलं?

Maharashtra BJP Politics : भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेतल्याने महायुतीतील वाद टळला
Mohit Kamboj, Ajit Pawar
Mohit Kamboj, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी चिट्ठी कार्यकर्त्यांनी लालबाग राजाच्या चरणी अर्पण करत प्रार्थना केली. यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांना नाव न घेता डिवचले. यातून वाद होण्याची शक्यता लक्षात घेताल भाजपश्रेष्ठींनी कंबोज यांना फटकारले. यानंतर त्यांनी ट्विट डिलिट करून होणारा वाद टाळला. दरम्यान, या ट्विटचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले होते. (Latest Political News)

Tweet
TweetSarkarnama

उपमुख्यमंत्री पवारांनी बुधवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी अर्पण केली. यात 'हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे!' अशी प्रार्थना करण्यात आली होती. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत असे काही कृत्य करू नका, असे आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

Mohit Kamboj, Ajit Pawar
Ghodganga Sugar Factory : घोडगंगा साखर कारखाना यंदा सुरू होणार का? शिवाजीराव काळेंच्या शंकांचे कारण काय?

कंबोज यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी लागणाऱ्या सदस्यसंख्येचा उल्लेख केला पवार गटावर टीका केली. मोहित कंबोज म्हणाले, मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नव्हे तर १४५ आमदारांची गरज असते, असे म्हटले आहे. या ट्विटचा आणि अजित पवार गटासोबत असलेल्या आमदारांचा संबंध जोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवार गट आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी फटकारले. यानंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले.

राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचे बोलले जात आहे. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही अजित पवार मुख्यमंत्री होण्याची चर्चा होत आहे. याबाबत राज्यभर फ्लेक्सही झळकले आहेत. यातच लालबागच्या चरणी अर्पण केलेल्या चिठ्ठीवरून मोहित कंबोज यांनी संधी साधून अजित पवार गटाला घायाळ केले आहे. भाजप वरिष्ठांनी मात्र वेळीच लक्ष घातल्याने होणारा वाद टळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mohit Kamboj, Ajit Pawar
Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील आठ ऑक्टोबरला नाशिकला ; मराठा आंदोलनकर्त्यांची भेट घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com