Ashish Shelar: शेलारांना ठाकरेंच्या 'मशाल'ची 'धग'; तो किस्सा सांगताच पिकला एकच हशा!

Ashish Shelar taunt Thackeray Group Mashaal Symbol: गाण्यात 'मशाल' हा शब्द असल्याने त्यांनी या गाण्याचं पहिलं कडवं बोलणं टाळलं.
Ashish Shelar taunt Thackeray Group Mashaal Symbol
Ashish Shelar taunt Thackeray Group Mashaal SymbolSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: मुंबई भाजपचे अध्यक्ष, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विळ्या-भोपळ्याचे नातं सर्वश्रृत आहे. ठाकरे गटावर टीका करण्याची एकही संधी शेलार सोडत नाहीत. अनेक वेळा ते कवितांच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसैनिकांवर कागदी बाण सोडतात.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या चिन्ह 'मशाल'चा उल्लेख कऱणं आपल्या भाषणात टाळलं. कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभात आशिष शेलार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यामुळे सभागृहात उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आपल्या भाषणादरम्यान शेलारांनी व्यासपीठावरील मान्यवर आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत एक प्रसंग सांगताना शेलार यांनी संगीतकार अजय-अतुल यांचं प्रसिद्ध गीत "लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा" याची आठवण करून दिली. या गीताचे पहिले कडवे मी म्हणत नाही. कारण 'मशाल' असे ते म्हणाले

Ashish Shelar taunt Thackeray Group Mashaal Symbol
Ajit Pawar: परंपरागत विरोधकाला अजितदादांचा पाठिंबा? छत्रपती कारखान्याच्या जबाबदारी सोपवणार..

या गाण्यात 'मशाल' हा शब्द असल्याने त्यांनी या गाण्याचं पहिलं कडवं बोलणं टाळलं "या गाण्यात मशाल हा शब्द आहे, त्यामुळे मी पहिलं कडवं बोलणार नाही” असं सांगत त्यांनी ते टाळलं. गाण्याचं दुसरं कडवं उच्चारत उपस्थित मान्यवरांची स्तुती केली. त्यांच्या या विनोदी आणि सांकेतिक शैलीने उपस्थितांमध्ये हास्याचं फवारे उडाले. ठाकरे गटाची निशाणी मशाल असल्याने शेलार यांनी आवर्जून हे कडवं न बोलल्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू झाली.

Ashish Shelar taunt Thackeray Group Mashaal Symbol
Top 10 Government Schemes: सरकारच्या टॉप 10 योजना; तुम्हाला माहीत असल्याच पाहिजेत!

सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना याज्ञवल्क्य संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, "ठाणे वैभव"चे संपादक मिलिंद बल्लाळ, कार्यकारी विश्वस्त डॉ. सुरेश एकलहरे आणि समाजसेविका विद्याताई धारप यांचा समावेश होता.या पुरस्कारांचे वितरण डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नरेंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com