सरकार गेल्यावर शेलारांना आता झोपडपट्ट्यांचे प्रश्न आठवले !

Ashish_Shelar demands about slums
Ashish_Shelar demands about slums

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपला झोपड्यांच्या पहिल्या मजल्यावर राहाणाऱ्या 65 हजार कुटूंबांची आठवण झाली आहे. पहिल्या मजल्यावरील 2011 पर्यंतची पुनर्विकास तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पात्र ठरावीत.

त्याच बरोबर कोळीवाड्यातील पहिल्या मजल्यावरील घरांनाही विज मिटर देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री -आमदार ऍड.आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

राज्य सरकारने 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांना सशुल्क घर देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,यात एका झोपडीला एकच घर मिळते.कुटूंब वाढल्याने झोपडीधारकांनी घरावर पहिला मजला बांधला आहे.

अशी सुमारे 65 हजार कुटूंब आहेत.त्यांचे नव्या निकषानुसार पुनर्वसन होणे गरजेचे आहे.त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजने जाहीर केली आहे.त्या योजने अंतर्गत 2011 पर्यंतच्या पहिल्या मजल्यावरील घरांचे पुनर्वसन होऊ शकते.यासाठी अशा खोल्याची कागदपत्र तपासून त्यांना पात्र ठरवा अशी मागणी ऍड.आशिष शेलार यांनी केली.


झोपड्या बरोबरच ऍड.शेलार यांनी कोळीवाड्यांसाठी महत्वाची मागणी केली आहे.मुंबईतील 65 कोळीवाड्यातील घरांवरही गरजेपोटी पहिला मजला बांधण्यात आला आहे. या पहिल्या मजल्यावरील घरांना अद्याप अधिकृत विज जोडणी मिळत नाही.

तसेच  उच्च न्यायालयानेही मुंबईतील सर्वच झोपडीधारकांना पाणी देण्याबाबत निर्णय दिलेला आहे. तर म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या अनधिकृत ठरलेल्या रहिवाशांनाही वीज मिटर देण्याचे धोरण स्विकारले आहे. याच धर्तीवर कोळीवाड्यातील पहिल्या मजल्यावरील घरांनाही वीज मिटर मिळावा, अशी मागणी अँड. शेलार यांनी या पत्रद्वारे केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com