Ganpatrao Gaikwad News : ''...ही तर पालिकेच्या तिजोरीची सफाई !''; आमदार गायकवाडांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं

Dombivali Political News : '' वाढदिवसाच्या बॅनरवर तत्परतेने कारवाई करणारे पालिका प्रशासन...''
Ganpatrao Gaikwad News
Ganpatrao Gaikwad NewsSarkarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

Dombivali : कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. राजकीय हेतूने ही कारवाई केली गेली असं म्हणत शहर स्वच्छतेसोबत नाले सफाईकडे पण लक्ष द्या असं म्हणत आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

आमदार गणपतराव गायकवाड(Ganpatrao Gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनावर चांगलीच आखपाखड केली. गायकवाड म्हणाले, पावसाळा तोंडावर आला असतानाही कल्याण पूर्वेतील नाल्यांची सफाई झालेली नाही. आमदार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर तत्परतेने कारवाई करणारे पालिका प्रशासन नालेसफाई कामावर किती लक्ष देते असे म्हणत शुक्रवारी आमदारांनी अधिकाऱ्यांना पूर्वेतील विठ्ठलवाडी नाल्याची पाहणी केली. यावेळी नाल्याची सफाई पाहून ही नालेसफाई नाही पालिका तिजोरीची हात सफाई असल्याचा आरोप आमदारांनी केली. (Latest Marathi News)

Ganpatrao Gaikwad News
Shinde on Thackeray: घरात बसून काम करीत नाही, फिल्डवर असतो; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. राजकीय हेतूने ही कारवाई केली गेली असे म्हणत शहर स्वच्छते सोबत नाले सफाईकडे पण लक्ष द्या असं म्हणत आमदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विठ्ठलवाडी येथील नाले पहाणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आमदार(MLA) घेऊन गेले. त्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा तसाच असल्यानं ही सफाई कधी होणार असा प्रश्न आमदारांनी विचारला. मोठ्या नाल्याची ही स्थिती तर आतील छोटे नाले कसे असतील.

Ganpatrao Gaikwad News
BJP & Shivsena : युतीतील वादावर 'असा' पडला पडदा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह खासदार शिंदेंच्या मेगा बैठकीत काय घडलं ?

वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसांचे बॅनर महापालिकेने काढले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॅनर काढणाऱ्या प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना भर रस्त्यात आमदारांनी गाठून पुष्पगुच्छ देत सत्कार केला. तसेच कारवाईचे स्वागत करत टोलाही लगावला.

गायकवाड काय म्हणाले ?

आमदार गायकवाड म्हणाले, महापालिकेने केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी. सरकारी जागेवर बेकायदा बॅनर लावले गेले आहे. त्याविषयी तक्रारी करुन देखील त्या विरोधात कारवाई केली जात नाही. मात्र मी लावलेल्या बॅनरवर कारवाई करण्यात तत्परता दाखविली जाते. कारवाई करताना दुजाभाव केला जातो असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Ganpatrao Gaikwad News
Anna Bansode News : अजितदादांचा कट्टर समर्थक आमदाराच्या कार्यालयात थेट मुख्यमंत्र्यांची 'एन्ट्री' ! चर्चांना उधाण...

दोन दिवसांत ही कामे झाली पाहिजेत

नालेसफाईची कोट्यवधीची बिले काढायची आणि वाटून घ्यायची. नालेसफाई नव्हे ही पालिकेच्या तिजोरीची सफाई असा आरोप गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांवर केला. तसेच दोन दिवसांत ही कामे झाली पाहिजेत नाही तर माझ्यासोबत पुन्हा पाहणी करायची असा सज्जड दम देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com