भाजपवर नाराज असलेल्या मंदा म्हात्रे पोचल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात!

मंदा म्हात्रे या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. सध्या त्या बेलापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.
Manda Mhatre-jayant patil

Manda Mhatre-jayant patil

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी गुरुवारी (ता. ६ जानेवारी) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांची राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण, त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपबाबत सूचक वक्तव्य केले होते. तसेच, पारंपरिक विरोधक गणेश नाईक यांच्यासोबत त्यांचा कायम उभा दावा असतो. (BJP MLA Manda Mhatre meet to NCP State President Jayant Patil)

भारतीय जनता पक्षाच्या आमदार असूनही मंदा म्हात्रे यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसून विकास कामांसंदर्भात मी जयंत पाटील यांची भेट घेतली, असा दावा आमदार म्हात्रे यांनी भेटीनंतर केला आहे. मात्र, त्या बराच वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्याने एकच चर्चा रंगली आहे.

<div class="paragraphs"><p>Manda Mhatre-jayant patil</p></div>
मंत्र्याची विकेट पडणार की राजू शेट्टींना गुलालाची संधी मिळणार?

आमदार मंदा म्हात्रे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होत्या. पक्षाने त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्या २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर बेलापूरमधून विधान सभेच्या आमदार झाल्या आहेत. म्हात्रे यांच्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक असलेले गणेश नाईक यांनीही राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला, त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच म्यानात आहेत. मात्र, ते एकत्र राहू शकत नाही, हे गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे.

<div class="paragraphs"><p>Manda Mhatre-jayant patil</p></div>
अजितदादांना टक्कर देणाऱ्या कंदांना फडणवीसांचे भोजनाचे निमंत्रण!

काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात आपल्यावर भाजपकडून कसा अन्याय झाला आहे, हे जाहीरपणे सांगितले होते. तसेच, स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाला बोलावले जात नाही, अशा शब्दांत म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांच्या नाव न घेता हल्लाबोल केला होता. तसेच, शासकीय रुग्णालयाच्या जागेवरूनही मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रुग्णालयासाठी सिडकोने मोफत भूखंड द्यावा, अशी मागणी करणारे सत्तेत असताना झोपले होते का. आतापर्यंत घेतलेल्या भूखंडाच्या मोबदल्यात सिडकोला ५० कोटी रुपये दिले आहेत, त्यामुळे मोफत भूखंडाची मागणी करून आमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका गणेश नाईक यांच्यावर केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com