Nitesh Rane : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावर काल (बुधवारी) विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणेंची (Nitesh Rane)खिल्ली उडवली होती. त्याला आज (गुरुवारी) नितेश राणेंनी अजित पवारावर प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी याबाबत टि्वट केलं आहे.
शरद पवार यांच्यावर राणेंनी केलेल्या टीकेवर अजित पवार यांना विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले होते.
अजित पवार म्हणाले, "टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नसतो,"
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान हिवाळी अधिवेनशात वाद निर्माण झाला आहे.
अजित पवार यांच्या विधानावरुन भाजप,शिंदे गट आक्रमक झाला आहे.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरनितेश राणे यांनी केलेल्या टीकेमध्ये शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
नितेश राणे यांनी आज टि्वट करीत अजित पवारांवर पलटवार केला आहे. "लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही," असे टि्वट नितेश राणे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.