Nitesh Rane: राणेंना पेंग्विन, बदकाची उपमा देणाऱ्या ठाकरेंच्या 'मातोश्री'समोर झळकले 'वस्ताद' अन् 'हिंदू गब्बर'चे बॅनर

Rane vs Thackeray Banner Placed Outside Matoshree:राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नितेश यांचा उल्लेख 'वस्ताद' अन् 'हिंदू गब्बर' असा केला आहे. ठाकरेंनी शिवसेना वर्धापनदिनी केलेल्या टीकेचा वचपा काढण्यासाठी राणे समर्थकांनी ही कृती केली असल्याचे बोलले जाते.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे नेते, मंत्री नितेश राणे यांचे विळ्या-भोपळ्याचे नातं सर्वश्रृत आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर तोफ डागली. त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी नितेश राणे यांच्या समर्थकांनी 'मातोश्री'समोर बॅनरबाजी केली आहे.

नितेश राणे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर राणेंच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली आहे. राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नितेश यांचा उल्लेख 'वस्ताद' अन् 'हिंदू गब्बर' असा केला आहे. ठाकरेंनी शिवसेना वर्धापनदिनी केलेल्या टीकेचा वचपा काढण्यासाठी राणे समर्थकांनी ही कृती केली असल्याचे बोलले जाते.

Nitesh Rane
Atul Londhe ON Caste Census: भाजपच्या हेतूंबाबत साशंकता; तेलंगणा मॉडेल देशभर राबवा!

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला. 'उंची पेंग्विनची, चाल बदकाची अन् आवाज कोंबडीसारखा...' , असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर राणे समर्थकांनी दिली आहे.

Nitesh Rane
Raju Shetti: घोटाळेबाज लोकांना फडणवीसांचे संरक्षण; राजू शेट्टींचा आरोप; अमिताभ गुप्ता, सुपेकरांची चौकशी करा

'सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात आहेत. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेले आहे. अरे तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही,'अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांची भरसभेत कान टोचले होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com